Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Friday horoscope In Marathi: आजचा दिवस चांगला असून गृहसौख्यासाठी उत्तम दिवस आहे. अनेक जातकांना त्यांच्या व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तर काहींसाठी आजचा दिवस खर्चिक असेल.

Anjali Potdar

शुक्रवार,१९ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,दर्श वेळा, अमावस्या.

तिथी-अमावस्या (अहोरात्र)

रास-वृश्चिक २२|२१ नं. धनु

नक्षत्र-जेष्ठा

योग-शूल

करण-चतुष्पाद

दिनविशेष-अमावस्या वर्ज्य

मेष

काहीतरी गूढत्वाच्या मागे आज आपले मन धावेल. मग गुप्तधन ते असेल,अचानक मिळणाऱ्या पैशाच्या मागे मन धावेल. भ्रष्टाचार,लाच लुचपत यापासून सावध राहण्याचा इशारा आहे.कष्ट मेहनत वाढेल .

वृषभ

कामाच्या ठिकाणी काहीतरी वेगळेपण असण्याचा आज योग आहे. नवीन घडामोडी घडतील. जवळच्या व्यक्तींच्या कडून योग्य दिशा मिळेल. भागीदारी व्यवसायामध्ये फायदा दिसतो आहे .

मिथुन

न ठरवता काही गोष्टी करण्याच्या मागे लागू नका. कामांमध्ये अडथळे अधिक प्रमाणात येतील. कामाचे व्यवस्थापन, आयोजन, नियोजन आज चांगले ठेवा. आपल्याच लोकांच्या कडून अडचणी उद्भवतील.

कर्क

प्रेमासाठी व्यापक दृष्टिकोन मिळेल. नव्या ओळखी परिचय यामध्ये रंगत वाढेल. शेअर्समधील व्यवसाय फायदेशीर ठरेल. दिवस चांगला आहे. शंकराची उपासना करावी.

सिंह

गृहसौख्याला दिवस उत्तम आहे. नवीन वाहन खरेदी, घराशी निगडित व्यवहार होणार असतील तर दिवस उत्तम असे फलित देईल. मातृसौख्य चांगले मिळेल.

कन्या

लहान प्रवासामधून फायदा होईल.भावंडांचे सहकार्य उत्तम राहील. प्रेमातून लाभ मिळतील. दिवस चांगला आहे.

तुळ

धनयोग चांगले आहेत. जुन्या अडकलेल्या पैशाशी निगडित व्यवहार आज सुकर होतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. रसना वाढेल.

वृश्चिक

मनासारख्या गोष्टी घडतील.स्वतःसाठी विशेष वेळ काढून नवीन संकल्प घ्याल. जुन्या गोष्टी पूर्णही होतील.आनंददायी दिवस आहे. आरोग्य चांगले राहील.

धनु

खर्च वाढतील. मनासारख्या गोष्टी होण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. मनोबल कमी राहील. अध्यात्मिक बैठक चांगली ठेवल्यास दिवस बरा आहे.

मकर

अनेक लाभ घेऊन आलेला आजचा दिवस आहे. नव्याने ओळखी होतील. परिचयामधून फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या घराण्यात धावपळीत दिवस कसा जाईल कळणार नाही. दिवस चांगला आहे.

कुंभ

कामामध्ये चांगली वाढ होईल आपले क्षेत्र रुंदावेल. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग आहेत. राजकारणात सुद्धा आघाडी मिळेल. केलेल्या कामाचे यश मिळेल अर्थात "कष्टाचे चीज झाले". असे म्हणण्याचा दिवस आहे.

मीन

भाग्याला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. सद्गुरूंची उपासना फायदेशीर ठरेल. मोठे प्रवास घडतील. काही सुवार्ता कानी येतील. दिवस चांगला आहे. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT