शुक्रवार,२० जून २०२५,ज्येष्ठ कृष्णपक्ष.
तिथी-नवमी ०९|५०
रास- मीन २१|४५ नं. मेष
नक्षत्र-रेवती
योग-शोभन
करण-गरज
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - अनेक दिवस मनात असलेल्या गोष्टी या काही रूपाने मार्गावर येतील असे वाटते आहे. परदेश गमनाचे योग सत्यात उतरण्यासची वाटचाल सुरू होईल. काम आणि धावपळ याच्यामध्ये दिवसाची व्यस्तता आहे. मानसिक उद्विग्नता असेल.
वृषभ- मैत्रिणींच्या कडून लाभाचे योग आहेत. नव्याने परिचय होतील. वेगळा हुरूप आणि उमेद येईल. दिवसाची सुरुवात नव्याने आणि शेवट आनंदाने होईल.
मिथुन - आजपर्यंत केलेल्या गोष्टींचे मूर्त रूप कामाला जाणवेल. सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष घोडदौड होईल. आपल्या लोकांच्याकडून शाबासकीची थाप मिळेल.
कर्क - शंकराची उपासना केल्याने आज विशेष उत्तम फले मिळतील. मोठे लांबचे प्रवास घडतील. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. सुवार्ता कानी येण्याचा आजचा दिवस आहे .
सिंह - जेवढे श्रम कराल तेवढे यश मिळेल. काही वेळेला एकटे पडल्याची भावना मनामध्ये निर्माण होईल. पण नेटाने कामे कराल. अचानक धनलाभची शक्यता आहे.
कन्या - आपल्याला उत्तम असा जोडीदार लाभलेला आहे. त्यामध्ये चांगली बुद्धिमत्ता आहे कामाच्या ठिकाणी त्यांचा सल्ला आपल्याला आज मोलाचा ठरेल. एकमेका सहाय्य करू असा दिवस आहे.
तूळ -नोकरीमध्ये नवा twist येईल. केलेल्या कामाची पोच पावती आज मिळेल. गुप्त शत्रू मात्र यामुळे वाढतील. चांगले कोण आणि वाईट कोण हे जगात ओळखून आज चालल्यास दिवसाची परिणीती आनंदात होईल.
वृश्चिक - कुलस्वामिनी ची उपासना आज करावी. विद्या,धन, संपत्ती, प्रेम, प्रणय या सर्वच गोष्टींमध्ये आज सुख लाभणार आहे. सकारात्मकता वाढेल.
धनु - घरी एखादे धार्मिक कार्य घडण्याचे योग आहेत. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल. घराचे व्यवहार, जमीन खरेदीचे व्यवहार मनासारखे पार पडतील.
मकर - भावंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. वाहने मात्रा जपून चालवावी. शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार आजच्या दिवसात पार पडतील.
कुंभ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्या. नव्याने गुंतवणूक करायसाठी दिवस चांगला आहे. मात्र आज मोठ्या गोष्टींमध्ये कुठेही साक्षीदार राहू नका. प्रेमाने जवळ असलेल्या लोकांची साथ मिळेल.
मीन - धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग राहील. सचोटीने व्यवहार करण्याकडे कल राहील. पुण्य संचय करण्याचा आजचा दिवस आहे. आरोग्य सुद्धा उत्तम राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.