हे आहेत... मुंबईतील 2006 च्या साखळी बॉम्बस्फोटात तरुण लेकीला गमावलेले रमेश नाईक.. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर पीडित कुटुंबानं संताप व्यक्त केलाय. लोकलमध्ये 11 जुलै 2006 रोजी 7 भीषण स्फोट झाले. या स्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला तर 827 जण जखमी झाले होते. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठानं या खटल्याचा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे 9 वर्षांपूर्वी सत्र न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षा रद्द करण्यात आलेत. तसंच या प्रकरणातील एकूण 12 दोषींना तत्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आलेत
हायकोर्ट काय म्हणालं?
साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत
स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य
स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश
बॉम्ब कसे होते तेच माहित नाही तर मिळालेलं बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही
दरम्यान या खटल्यातील इतर 15 आरोपी अजूनही फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे मुंबई हायकोर्टनी दिलेला निर्णय जर योग्य असेल तर मग ते बॉम्ब लास्ट घडवले नेमके कोणी ? असा सवाल तरुण लेकीला गमावणाऱ्या रमेश नाईकांनी उपस्थित केलाय.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी केलीय.
हायकोर्टात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आरोपी हे प्रशिक्षित दहशतवादी असून ते दयेस पात्र नाहीत.. त्यामुळे त्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केलाय. त्यात तुरुंगवास भोगत असलेले आरोपी निर्दोष असल्याचं हायकोर्टानं म्हटलयं. त्यामुळे तपास यंत्रणांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतयं. या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.