March 2025 Triple Rajyog saam tv
राशिभविष्य

Four Rajyog On 2026: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच बनणार 4 राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब रातोरात चमकणार

Rajyog beginning of next year luck: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन किंवा अधिक महत्त्वाचे ग्रह एका विशिष्ट शुभ आणि शक्तिशाली संयोगात येतात, तेव्हा त्याला राजयोग म्हणतात. आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच असे ४ राजयोग तयार होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, 2026 मध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करणार आहेत. याचा प्रभाव मानवी जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला 4 राजयोग निर्माण होणार आहेत. हे राजयोग म्हणजे हंस राजयोग, बुधादित्य राजयोग, महालक्ष्मी राजयोग आणि गजकेसरी राजयोग आहेत.

या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींचे नशीब पालटू शकणार आहे. नवीन नोकरीच्या संधींसह भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी हे 4 राजयोग लाभदायी ठरू शकतात. नवीन काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा आर्थिक बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आपल्या उद्दिष्टांकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

कन्या राशी (Kanya Zodiac)

चार राजयोगांची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भाग्य तुमच्या सोबत असेल. कुटुंब आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल.

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी हे 4 राजयोग शुभ फलदायी ठरणार आहेत. या काळात स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता, घर किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

Kothimbir Vadi Tips: कोथिंबीर वडी नरम होते, आतून कच्ची राहतेय? मग वापरा ही एक ट्रिक, खमंग कुरकरीत होतील वड्या

Pune Tourism : हिरवेगार डोंगर अन् पांढरे शुभ्र धबधबे; पुण्याजवळील निसर्गरम्य ठिकाण, हिवाळी ट्रिपसाठी बेस्ट

Bigg Boss 19 : हीच सून हवी! "तू २६ चा, ती २१ ची"; कुनिकानं ठरवलं मुलाचं लग्न,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT