Karwa Chauth 2024 Rajyog saam tv
राशिभविष्य

Karwa Chauth 2024 Rajyog: करवा चौथच्या दिवशी बनणार ५ राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती भरपूर कमाई होणार

Surabhi Jagdish

करवा चौथ हा हिंदू सण आहे जो कार्तिक महिन्यात पौर्णिमेच्या चौथ्या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. हा निर्जळी उपवास असून हा सर्वात कठीण उपवास मानला जातो. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये ही प्रथा अधिकतर साजरी केली जाते.

यंदाच्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी करवा चौथ साजरी केली जाणार आहे. यंदाची करवा चौथ ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाची मानली जातेय. याचं कारण म्हणजे, या दिवशी खास राजयोगांची निर्मिती होतेय. हे राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फार शुभ मानले जाणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

ज्योतिषीय गणनेनुसार, यावेळी करवा चौथला शश, गजकेसरी योग, समसप्तक, बुधादित्य आणि महालक्ष्मी असे एकूण ५ राजयोग तयार होणार आहेत. या राजयोगांची निर्मिती काही राशींना भरपूर सुख देऊन जाणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

करवा चौथला तयार होणारे 5 राजयोग वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. आर्थिक गुंतवणुकीसाठीही वेळ उत्तम आहे. चांगली बढती मिळण्याची शक्यता असल्याने हातात चांगला पैसा येईल.

तूळ रास

करिअरच्या दृष्टीने तूळ राशीच्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील नवीन नोकरी मिळू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला नफा आणि तोटा दोन्ही होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात अडचणी दूर होतील. तुम्ही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

SCROLL FOR NEXT