Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: दिवाळीपूर्वी ५ ग्रह बदलणार त्यांची चाल; 'या' राशींना लागणार भला मोठा जॅकपॉट, मिळणार नुसता पैसा

Grah Gochar: दिवाळीपूर्वी ग्रहांच्या स्थितीत अनेक मोठे बदल झाले आहेत. या काळात काही राशींच्या व्यक्तींना याचा परिणाम मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी ऑक्टोबर महिना ग्रहांच्या हालचाली आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या संयोगांमुळे खूप खास आहे. या वर्षी धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी ग्रहांच्या स्थितीत अनेक मोठे बदल झाले आहेत. या ग्रहांच्या बदललेल्या हालचालीमुळे शुभ संयोग आणि राजयोग निर्माण झालेत. 20 ऑक्टोबर 2024 पासून मंगळ देवाने आपली राशी बदलून याला सुरूवात केली आहे.

कोणते ग्रह बदलणार त्यांची स्थिती?

  • उद्या म्हणजेच बुधवारी 23 ऑक्टोबर 2024 रोजी बुध ग्रह विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

  • गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यावेळी शुक्र आणि मंगळ देखील नक्षत्र बदलणार आहेत.

  • 27 ऑक्टोबरला शुक्र ज्येष्ठ आणि सोमवार 28 ऑक्टोबरला मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

  • मंगळवारी 29 रोजी बुध ग्रह त्याची रास बदलणार असून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.

  • बुधवारी 30 तारखेला वरुण ग्रह म्हणजेच नेपच्यून सुद्धा पूर्वा भाद्रपदात नक्षत्र गोचर करणार आहे.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, या ग्रहांच्या हालचालीचा बदल दिवाळीमध्ये सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना याचा परिणाम मिळणार आहे. यामध्ये काही लोक श्रीमंत होणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींच्या समावेश आहे ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने ग्रहांचं गोचर खूप उत्तम असणार आहे. पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळू शकणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना या काळात दुप्पट नफा मिळेल. लव्ह लाईफ देखील आनंदी राहणार आहे. नवीन उद्योग किंवा काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.

कुंभ रास

हे पंचग्रही बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला फायदा देणार आहेत. तुम्ही स्वतःला फ्रेश वाटून घ्याल. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. तुम्हाला नोकरीत यश आणि अनेक शुभ संधी मिळू शकतात. व्यवसाय वाढेल आणि प्रवासात फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी दिवाळीपूर्वी 5 ग्रहांच्या हालचालीत होणारे बदल प्रवासाच्या दृष्टीने खूप चांगले असणार आहेत. या काळात तुम्हाला व्यवसायात नफाही मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

SCROLL FOR NEXT