येणारं वर्ष 'या' राशींसाठी लकी ठरणार Saam Tv
राशिभविष्य

New Year 2022 | येणारं वर्ष 'या' राशींसाठी लकी ठरणार, धनलाभ होणार

ज्योतिषशास्त्रानुसार, येणाऱ्या नवीन वर्षात अशा काही रास आहेत ज्यांच्यावर धनवर्षा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प पडले. त्यानंतर आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यातच आता चाहुल लागली आहे ती नवीन वर्षाची. येणार नवीन वर्ष कसं असेल, या वर्षात आर्थिक परिस्थिती सुधारेल का असा प्रश्न आहे. तर, ज्योतिषशास्त्रानुसार, येणाऱ्या नवीन वर्षात अशा काही रास आहेत ज्यांच्यावर धनवर्षा होणार आहे. (Financial condition of these zodiacs will improve in upcoming year 2022)

सिंह रास (Leo)

सिंह राशी (Zodiac) च्या लोकांसाठी नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नशिबाची साथही लाभेल. गेल्या अनेक काळापासून नोकरी शोधत असणाऱ्यांना यावर्षी चांगली नोकरी मिळू शकते. येणाऱ्या नवीन वर्षात (New Year) तुमच्या आर्थिक स्थितीत (Financial condition) सुधारणा होईल.

हेही वाचा -

वृषभ रास (Taurus)

यावर्षी तुम्हाला नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ लाभेल. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक कराल ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल.

कन्या रास (Virgo)

या राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षात धनलाभ होणार आहे. नौकरीत मान-सम्मान मिळेल आणि पगारही वाढेल. त्यामुळे तुम्हाला खर्च सांभाळने सोयीस्कर होईल. व्यवसायातही प्रगती होईल.

धनु रास (Sagittarius)

2022 मध्ये तुम्ही आर्थिक बाबतीत मजबूत आणि स्थिर राहाल. उत्पन्नात कमी किंवा खर्चाची चिंता नसेल. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्यात मदत करेल.

(टीप - यथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठीण? VIDEO

SCROLL FOR NEXT