Mahalakshmi Yog Saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog: फेब्रुवारी महिन्यात बनणार महालक्ष्मी राजयोग; 'या' राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, मिळणार अपार पैसा

Mahalakshmi Yog 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह असून तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. तर मंगळ एका राशीत सुमारे ४५ दिवस असतो.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरदरम्यान अनेक ग्रह एकाच राशीमध्ये एकत्र येतात. ग्रहांच्या संयोगामुळे वेळोवेळी शुभ योग तयार होतात. असंच येत्या काळात चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने शुभ योग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह असून तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. तर मंगळ एका राशीत सुमारे ४५ दिवस असतो.

चंद्र-मंगळ तयार करणार राजयोग

मंगळ आणि चंद्राच्या संयोगामुळे ८ फेब्रुवारीला महालक्ष्मी नावाचा राजयोग तयार होणार आहे. सध्या मंगळ मिथुन राशीत आहे. 08 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्र मिथुन राशीत असणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे महालक्ष्मी योग तयार होणार असून या राजयोगाच्या निर्मितीने व्यक्तीचा मान-सन्मान वाढणार आहे. तर काही राशींच्या घरी चांगला पैसा येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास

चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने तयार होणारा महालक्ष्मी राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून पैसा मिळू शकतो.

कुंभ रास

मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने तयार होणारा महालक्ष्मी राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकणार आहे. या लोकांना कुठूनतरी अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

08 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने तयार होणारा महालक्ष्मी राजयोग तुमच्या राशीच्या पाचव्या घरात येणार आहे. नफ्याच्या संधी वाढल्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढणार आहे. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT