Chandra-Ketu Yuti saam tv
राशिभविष्य

Chandra Ketu Yuti: होळीला कन्या राशीमध्ये बनणार ग्रहण योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडथळे

Chandra Ketu Yuti: चंद्र शुक्रवारी १४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:५६ वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तो या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या छाया ग्रह केतूच्या संयोगाने असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

चंद्रग्रहण ही एक विशेष खगोलीय घटना असून ज्याचं ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. यामागील कारण म्हणजे या घटनेत चंद्राचा सहभाग असून जो मानवी मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. ग्रहणामुळे चंद्र दूषित आणि पीडित होतो, असं मानलं जातं. ज्यामुळे मन, मेंदू आणि विचारांवर नकारात्मक प्रभाव वाढतो.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, चंद्र शुक्रवारी १४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:५६ वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तो या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या छाया ग्रह केतूच्या संयोगाने असणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि केतूचे मिलन चांगले मानलं जात नाही. ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांच्या युतीला ग्रहण योग म्हणतात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात खर्च आणि नुकसानीमुळे समस्या वाढणार आहेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण आणि चिंता वाढू शकणार आहे. आरोग्याच्या समस्या, विशेषतः डोकेदुखी आणि निद्रानाश, उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी असहकार आणि वादाची परिस्थिती उद्भवू शकते.

मीन रास

कन्या राशीत ग्रहण योग निर्माण झाल्यामुळे, मीन राशीच्या लोकांच्या कामावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. व्यावसायिक भागीदारीत मतभेद आणि वाद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी या ग्रहांच्या संयोगामुळे शत्रू, रोग आणि कर्ज वाढण्याची वाईट शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत अस्थिरता असण्याची शक्यता आहे. शत्रूंची संख्या वाढू शकते आणि ते तुमच्यावर मात करू शकतात. कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT