Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: मंगळाच्या गोचरमुळे या राशींच्या अडचणी वाढणार, पैसा जाणार आणि व्यवसायातही होणार नुकसान

Mangal Gochar 2025: ग्रहांच्या राशीबदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. यावेळी काहींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम होतो. यावेळी कोणत्या राशींवर याचा विपरीत परिणाम होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींव होतो. ७ जून २०२५ रोजी पहाटे २:२८ वाजता मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह राशी ही अग्नि तत्वाची स्थिर राशी आहे जी आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि अभिव्यक्ती यांचा कारक मानली जाते.

मंगळाने गोचर केलं असून त्याचा विपरीत परिणाम काही राशींवर होणार आहे. यामध्ये प्रभावामुळे काही राशींना प्रचंड ऊर्जा, यश आणि प्रगती मिळू शकणार आहे. तर काही राशींना राग, असंतुलन किंवा कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

हे गोचर चौथ्या घरात होतंय. यामुळे घरात वादाची परिस्थिती असू शकते किंवा आईच्या आरोग्याची चिंता असू शकणार आहे. तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर काळजीपूर्वक पावलं उचला. या काळात नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर फारसं चांगलं नसेल. तुम्हाला पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या काळात तुम्ही काही संधी गमावू शकता. तुमच्या बोलण्यात कठोरता किंवा घाई असू शकते. तुम्हाला तुमचे खर्च नियंत्रित करावे लागेल.

वृश्चिक रास

राशीच्या लोकांसाठी हे गोचर दशम भावात होणार आहे. यावेळी अति आत्मविश्वास किंवा रागामुळे तुमचे वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. घाईघाईत घेतलेला निर्णय देखील नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. म्हणून संयमाने निर्णय घ्या.

कुंभ रास

या राशींच्या व्यक्तीसाठी हे गोचर सातव्या घरात होणार आहे. ज्यामुळे वैवाहिक जीवन आणि भागीदारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदार असल्यास मतभेदांची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

Bigg Boss Marathi 6 : आठव्या आठवड्यात ७ सदस्य नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

US Iran conflict : अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रे एकवटली, इफ्तार पार्टीत ट्रम्प यांना इशारा

SCROLL FOR NEXT