Horoscope Today 29th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांची सकारात्मकता वाढेल; यश पदरात पडेल

Horoscope Today 29 May 2024 in Marathi : आजच्या दिवशी काही राशींच्या लोकांची सकारात्मकता वाढेल. यश पदरात पडल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जाणून घ्या तुमचे राशी भविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग २९ मे २०२४

 वार - बुधवार. तिथी - कृष्ण षष्ठी. नक्षत्र -  श्रवण. योग - इंद्र .करण - वाणिज. रास - मकर २०.०६ नंतर कुंभ. दिनविशेष - १६पर्यंत चांगला.

मेष : शिव उपासना करा

कामाच्या ठिकाणी विशेष यश मिळण्यासाठी शिव उपासना फलदायी ठरेल. नव्याने कामाची मुहूर्तमेढ रोवली जाईल.

वृषभ : ताळमेळ साधा

प्रपंच आणि परमार्थ यांचा आज ताळमेळ साधता आला पाहिजे. नुसतेच काम किंवा नुसतेच देवदेव हे आयुष्य नसते दोघांमध्ये समन्वय साधा दिवस चांगला राहील.

मिथुन : धनलाभाचे योग

भ्रष्टाचार किंवा वाईट मार्गाने पैसे आज मिळवू नका. दिवस त्रासाचा राहील. मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ दोन्हीही जपा. अचानक धनलाभाचे योग आहेत.

कर्क : कामामध्ये यश मिळेल

कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळेल. व्यवसाय व्यापारासाठी दिवस चांगला. छान नियोजन करा. यश आपलेच आहे.

सिंह : नोकरीत दगदग होईल.

जुने आजार डोके वर काढतील.आज विशेष व्यायाम, आहार याच्यावर लक्ष द्या. शारीरिक त्रास होणार नाही ना हे पहा. नोकरीमध्ये दगदग होण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या : आज आनंद शोधाल

हाताची कलाकुसर आज वृद्धिंगत होईल. काही छान गोष्टी करायचा मूड राहील. त्यामध्येच आज आनंद शोधाल.

तूळ : सावधगिरीने वागा

वाहने सावकाश चालवावी. वेगावर नियंत्रण ठेवा. दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील.

वृश्चिक : यश पदरात पडेल

अपेक्षांना पंख मिळतील गगनचुंबी विचार मनामध्ये येतील. आणि त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम कराल. यश पदरात पडेल.

धनु : छान फल मिळेल

दत्त उपासना करा. आज छान फल मिळेल. कुटुंबीयांसोबत दिवस चांगला राहील. विशेष गाठीभेटी होतील. त्यातून पुढील फायदा अपेक्षित आहे.

मकर : सकारात्मकता वाढेल

मस्त दिवस. आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आकाश वृंदावलेले राहील. सकारात्मकता वाढेल. हौशी राहाल.

कुंभ : मनस्तापाचा टाळा

काळजी आणि चिंता भगवंतावर सोडून द्या. स्वतः फक्त नेटाने काम करा मात्र आपल्याला कोणी फसवत नाही ना याकडे लक्ष द्या. आजचा दिवस तसा मनस्तापाचा तो टाळा.

मीन : भरभराटीचा दिवस

जुने मैत्रीचे बंध वृद्धिंगत होतील. यश मिळेल. लाभ मिळेल. एकूणच भरभराटीचा आजचा आपला दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टरांची संघटनांचा आज राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Governemnt Decision: मोठी बातमी! आता या लोकांचं जन्म-मृत्यू प्रमाणपत्र होणार रद्द; सरकारने घेतला मोठा निर्णय

नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

Jio ₹189 vs Jio ₹198: जिओ १८९ आणि १९८ प्लॅनमधून सर्वोत्तम कोणता? जाणून घ्या

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

SCROLL FOR NEXT