Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशीच्या व्यक्तींनी आज पैशांचे व्यवहार टाळा; तब्येतीची काळजी घ्या

Horoscope Today Marathi : मंगळवारचा दिवस काही ऱाशीच्या लोकांसाठी संकटाचा असेल. पैशांचे व्यवहार टाळावे लागतील, तसेच तब्येतीची काळजी देखील घ्यावी लागेल, जाणून घ्या तुमचे राशी भविष्य...
Rashi Bhavishya
Horoscope Today 28th May 2024Saam TV
Published On

आजचे पंचाग २८ मे २०२४

वार - मंगळवार. तिथी - कृ. पंचमी नक्षत्र - योग ब्रम्हा. करण -तैतील. रास - मकर. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : नवीन गाठीभेटी होतील

कामाच्या बाबतीत आज नव्याने काहीतरी गोष्टी बदल करावा अशी भावना होईल. त्यासाठी विशेष पावले उचलाल. नवीन गाठीभेटी होतील. मानसन्मान, प्रसिद्धी वाढेल.

वृषभ : देवाची विशेष उपासना करा

"भेटी लागे जीवा लागलीसे आस" असा दिवस आहे. देवाची विशेष उपासना आज फलदायी ठरेल. त्याच्याच कृपेमुळे अनेक सुखांची ओंजळ दानात आपल्याकडे मिळालेली आहे हे विसरू नका. देवी उपासना फलदायी ठरेल.

मिथुन : आज मनस्वास्थ्य जपा

"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही" ही जाणीव आज येईल. विनाकारण न केलेल्या गोष्टीत अडकण्याची शक्यता आहे म्हणून मनस्वास्थ्य जपा.

कर्क : कोर्टकचेरीत यश मिळेल

व्यापार व्यवसायासाठी नवीन बेत आखाल. संतती संदर्भात काही सुखाच्या गोष्टी कानावर येतील. फिरती, भ्रमंती राहील.तसेच कोर्टकचेरीत यश मिळेल.

सिंह : तब्येतीची काळजी घ्या

काहीतरी खाणं किंवा पिण्यामधून पोटाचे आजार डोके वर काढतील. म्हणून आज तब्येत जपण्यासाठी विशेष सल्ला आहे. सहकाऱ्यांच्या कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नका.

कन्या : पैशाची गुंतवणूक टाळा

शेअर्स किंवा लॉटरी मधील गुंतवणूक करताना चार वेळा विचार करा. खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक आज नको. उपासनेसाठी दिवस चांगला. शिव उपासना फलदायी ठरेल.

Rashi Bhavishya
Kark Rashi Nature : खेकड्यासारखी प्रवृत्ती, इतरांना मागे खेचण्यात पटाईत; कर्क राशीचे लोक नेमके कसे असतात? वाचा...

तूळ : कष्ट करावे लागतील

जमीन जुमला किंवा इतर प्रस्ताव जर काही मार्गात असतील किंवा आपले जागे संदर्भात पेंडिंग विषय असतील तर आज काम होईल. त्यासाठी विशेष कष्ट करावे लागतील. घरच्यांची दिलजमाई करावी लागेल.

वृश्चिक : भावंडांकडून सहकार्य मिळेल

मनातील अनेक गोष्टींना आज पंख फुटतील. धैर्याने सर्व गोष्टींना सामोरे जा. भावंडांच्या कडून विशेष सहकार्य लाभेल.

धनु : कोणालाही जामीन राहू नका

गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. पैशाशी निगडित असणाऱ्या गोष्टीत पावले उचला. कोणालाही जामीन राहू नका.

मकर : कामाची रूपरेषा ठरवा

सकारात्मकतेने भरलेला आजचा दिवस आहे. मन आनंदी राहील उत्साह वाटेल. कामाची रूपरेषा ठरवा. आजचा दिवस तुमचाच आहे.

कुंभ : दिवस समाधानाचा राहील

अस्वस्थता घेऊन येणारा आजचा दिवस आहे. म्हणून आज सकाळीच उठल्यावर थोडंसं योग आणि ध्यानधारणा केल्यास दिवस समाधानाचा राहील. नकारात्मक गोष्टींना थारा देऊ नका.

मीन : दत्त उपासना करा

काही गोष्टीत अडचणी आल्या तरी मित्र आणि सहकारी आज मदतीला येतील. संततीकडून सुखाच्या चार गोष्टी ऐकायला मिळतील. दिवस चांगलाच जाणार आहे. दत्त उपासना करा.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशीला मिळतील प्रगतीचे नवे मार्ग; भाग्यकारक घटना घडतील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com