Horoscope Today 17 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांना आज भाग्याची मिळणार साथ; तुमची रास कोणती?

Rashi Bhavishya 17 June 2024 : आजचे राशी भविष्य, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा सोमवार? जाणून घ्या राशी भविष्याच्या माध्यमातून...

Anjali Potdar

आजचे पंचांग १७ जून २०२४

वार - सोमवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल एकादशी. नक्षत्र - चित्रा. योग - परिघ. करण - विष्टी. रास - तूळ. बकरी ईद. दिनाविशेष - वृद्धीतिथी.

मेष : जोडीदाराविषयी ओढ वाटेल

"भेट तुझी माझी स्मरते" असा आजचा गुलाबी दिवस आहे. जोडीदाराविषयी ओढ वाटेल. एकमेकांच्या सहकार्याने अनेक कामे पार पाडाल. दिवस छान जाईल.

वृषभ : तब्येतीच्या तक्रारी जाणवतील

आपली शुक्राची रास असली तरी आज शुक्राचे गुण जाणवत नाहीत. मानसिक अस्वस्थता, तब्येतीच्या तक्रारी या गोष्टी जाणवतील. पैशाची निगडित अडचणीत सापडू नका.

मिथुन : देवधर्मावर विश्वास वाढेल

आनंद व आशावाद हीच आयुष्याची पक्की वीट आहे. हा आनंद द्विगुणीत होईल भाग्याची साथ मिळेल. त्या पद्धतीने देवधर्मावर विश्वासही वाढेल .

कर्क : कामांमध्ये यश मिळेल

हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळणार आहे. वेगळ्या संधी, प्रसिद्धी, किर्ती आज पायाशी लोळण घालतील. म्हणजेच काय कामाचा ताणतणाव यामधून सुध्दा जावे लागेल मग शिरपेचामध्ये तुरा खोवला जाणार हे नक्की.

सिंह : महत्त्वाची कामे मार्गी लागतील

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या गोष्टींची सार्थकता झाल्याचे आज जाणवेल. दिवस आशावादी राहील.

कन्या : अतिविचार करू नका

इतका विचार करू नका की आयुष्याच्या सर्व वाटा संपल्यात की काय? आपली रास अतिविचारी असल्यामुळे माझा विशेष संदेश मानसिक अस्वस्थता कोणत्याही मार्गाने येणार नाही हे लक्षात ठेवा.

तूळ : आनंदाचे तुषार लाभतील

"मन धागा धागा वेचतो नवा" असा आजचा दिवस आहे आरोग्य उत्तम राहील कामे धाडसाने पार पाडाल. नव्या उमेदीने काही गोष्टी कराल आपल्यामुळे इतरांना आनंदाचे तुषार लाभतील.

वृश्चिक : लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करा

"वेळ आणि पैसा याचा ताळमेळ साधा" आवक जावक याचा नीट हिशोब ठेवा. लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपासना करण्यासाठी आजचा दिवस चांगला.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल

काही नवीन परिचय आज होतील. त्याच्यामधून पुढील कामे सहजगत्या होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा आजचा दिवस आहे.

मकर : माहेरच्या आठवणी जास्त येतील

"घाल घाल पिंगा" असा आजचा दिवस आहे माहेरच्या आठवणी जास्त येतील. कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतीत कराल. प्राण्यांविषयी विशेष ओढ वाटेल .

कुंभ : मनोरंजन क्षेत्रात आनंद लुटाल

सामाजिक क्षेत्रात विशेष पुढाकार घ्याल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. कला मनोरंजन क्षेत्रात आनंद लुटाल.

मीन : कामाचा तणाव वाढेल.

आरोग्याच्या तक्रारी, कटकटी कामाचा ताण आणि तणाव वाढेल. पण जिद्द आणि उमेदीने सगळ्याला सामोरे जाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT