Horoscope Today 18 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचा जुळून आलाय लग्नाचा योग; जोडीदार मिळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग १८ जुलै २०२४

गुरुवार दिनांक- १८जुलै २०२४. आषाढ शुक्लपक्ष, तिथी- द्वादशी.नक्षत्र-जेष्ठा, योग -ब्रम्हा. करण-बव. रास -वृश्चिक वामन पूजन, गोपद्म व्रत आरंभ, दिनविशेष- जेष्ठा वर्ज्य.

मेष- आज काळजी घेण्याची गरज

काही कामे डोक्याने नाही तर बुद्धीने करावे लागतात. त्यातलाच आजचा दिवस. मनाला नको त्या गोष्टी कराव्या लागतील, अडचणी आणि त्रास वाढतील. कदाचित खोट्या गोष्टीत आपल्याला आज कोणी अडकवण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

वृषभ - व्यवसाय - व्यापारामध्ये वृद्धीच्या संधी

मस्त आणि कलंदर असा आजचा दिवस आहे. ठरवाल ते होईलच. व्यवसाय - व्यापारामध्ये वृद्धीच्या संधी येतील. कामासाठी प्रवास घडतील. कोर्टकचेरी कामामध्ये यश मिळेल.

मिथुन - कटकटी वाढतील.

उगाचच कोणीतरी आपल्याला दूषणे देत आहेत हे जाणवेल. डोक्याचे त्रास आणि कटकटी वाढतील. पित्त आणि डोकेदुखी होईल. नोकर वर्गांपासून सावध रहा.

कर्क -धनयोगाच्या अनेक संधी

धनयोगाच्या अनेक संधी एकत्रित त्या आज आलेल्या आहेत. त्याचे सोने करा. उपासना फलद्रूप होईल. आज गोपद्म व्रतआरंभ होत आहे. देवापुढे 33 गोपद्म रोज काढल्यास आपले मनोरथ पूर्ण होतील.

सिंह - दिवस चांगला जाईल.

एखादी गोष्ट करताना त्याचे श्रेय आपल्याला मिळेल की नाही, याचा विचार करू नका. काम केले आहे तर ते पुण्याच्या परडीमध्ये चांगली फलिते भरून देणारे आहे. घरात घरच्यांना समजून घ्या. दिवस चांगला जाईल.


कन्या- दिवस धावपळीचा जाईल.

निसर्गप्रेमींसाठी दिवस उत्तम संधी घेऊन आलेला आहे. छोटे प्रवास पावसाळी सहल आपल्याकडून आयोजन होईल. यामध्ये भावंडांचे विशेष सहकार्य लाभेल. दिवस धावपळीचा जाईल.

तुळ-मोठी गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला

ठरवता अनेक गोष्टी आज सहज मार्गी लागतील. घरच्यांचे सहकार्य ,मुलांची मदत राहील. मोठी गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. पण कोणासही साक्षीदार आज राहू नका .

वृश्चिक - स्वास्थ आणि समृद्धीच्या दिवशीने दिवस चांगला

जे आपले ते आपलेच असते याची भावना आज दाट होईल. इतरांकडून सहकार्याची अपेक्षा न करता स्वतःवर भरवसा ठेवा आणि पुढे चला. स्वास्थ आणि समृद्धीच्या दिवशीने आजचा दिवस चांगला आहे.

धनु - मनस्वास्थ्य खराब राहील.

मोठे प्रवास होतील किंवा त्याचे नियोजन होईल. वस्तू गहाळ होणे, विनाकारण खर्च याच्यासाठी आजचा दिवस आहे असं म्हणता येईल. मनस्वास्थ्य खराब राहील. त्यासाठी विशेष उपासना करावी.

मकर- नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

जुन्या केलेल्या गोष्टींचे उत्तम फलित आज मिळणार आहे. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. त्यांच्याबरोबर स्नेहभोजनाचे योग आज येतील.

कुंभ-दिवस चांगला जाणार

कामाची वेगळी धावपळ आजचा दिवस घेऊन आलेला आहे. सहकारी आपल्याला मदत करतील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. सामाजिक कार्यातही आपण पुढाकार घ्याल. दिवस चांगला जाणार आहे.

मीन- प्रगतीसाठी विशेष विचार करा.

साधेपणा सोडून स्वतः कधीतरी स्ट्रॉंग व्हावे लागते. आपल्या प्रगतीसाठी विशेष विचार करा. देवावर दाट श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास प्रगतीचे द्वार आणि यशाची कवाडे आज खुली होतील.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : आनंद दिघे असते तर यांना फोडून खाल्ले असते, संजय राऊताचा हल्लाबोल

Kalyan News : तरुणीची छेड काढल्याने कल्याणमध्ये मोठा राडा; दोन गटात तुंबळ हाणामारी, ५ जणांना अटक

Maharashtra Politics : या बड्या मंत्र्याचा पुत्र उतरणार निवडणूक रिंगणात; नाव आलं समोर

Arbaaz - Nikki Love Connection: अरबाज अन् निक्कीचं खरंच प्रेम आहे? नेटकऱ्यांमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा का होतेय?

VIDEO: विद्यार्थ्यांचा गणवेश शिवलाय की चिंध्या जोडल्या? काहींना फाटलेले तर काहींना ढगळ कपडे, शिक्षक अन् पालकांचा संतापजनक सवाल

SCROLL FOR NEXT