Horoscope Today 19th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 19 May 2024 : आजचे राशिभविष्य, १९ मे २०२४ : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचाग १९ मे २०२४

वार- रविवार. तिथी - शु.एकादशी. नक्षत्र - हस्त .योग - वज्र. करण -विष्टि. मोहिनी एकादशी. दिनाविशेष - १४ नंतर चांगला.

मेष : शत्रूंवर हातघाई करू नका.

काहीतरी कारण होईल आणि आज हात जखडल्यासारखे होईल. काम असून उत्साह राहत नाही असे वाटेल. विनाकारण वाटेत येणाऱ्या शत्रूंवर हातघाई करू नका.

वृषभ : आजचा दिवस प्रणयी

"पाहिले न मी तुला तू मला न पाहिले" असा आजचा दिवस प्रणयी आहे. स्वप्नामध्ये रममाण व्हाल. मनोरंजन, कला यामध्ये विशेष सहभाग घ्याल.

मिथुन : सुखाची बरसात होईल

घरामध्ये पाहुण्यांचे सरबराई राहील. आपल्या स्वभावाप्रमाणे गप्पा, मनमौजीपणा, हसतमुखाने आजचा दिवस जाणार आहे. सर्व सुखाची बरसात होईल.

कर्क : भावंडांचे सहकार्य लाभेल

लेखन, विचार, मंथन, वैचारिक बैठका, चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची आज संधी मिळेल. भावंडांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आजचा दिवस भाग्याचा

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा आजचा दिवस आहे. पैसे मिळवणे आणि साठवणे यासाठी विशेष काही बेत आखाल आणि तसे काम कराल.

कन्या : सकारात्मकता मिळेल

बुद्धिमान लोकांशी आज बौद्धिक चर्चा होईल. मनाला एक वेगळीच उभारी राहील. आपल्यामुळे इतरांना सकारात्मकता मिळेल. दिवस एकूणच आनंदी व उत्साहाचा आहे.

तूळ : मनाच्या चिंता वाढवू नका

खर्चावर आवर घाला काही वेळेला इतरांच्या बोलण्याला आपण भरीस पडतो आणि त्यामुळे हात खर्चासाठी सैल राहतो. त्यामुळे आज याला आवर घाला. मनाच्या चिंता वाढवू नका. तर एकादशीनिमित्त विशेष विष्णू उपासना करा.

वृश्चिक : दिवस मनासारखा राहील

शेजारी संबंध दृढ राहतील. मनाप्रमाणे घटना घडताना प्रेमाची देवाणघेवाण राहील .जुने मित्र-मैत्रिणी भेटण्याची दाट शक्यता आहे. एकूण दिवस मनासारखा राहील.

धनु : जोमाने कामाला लागा

"काम आणि काम" असा दिवस आजचा आपला आहे. पण याचे श्रेय सुद्धा तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा." बढता चल तू बाढता चल" असा आजचा दिवस आहे.

मकर : संधीचे सोने करून घ्या

नशिबाचे चक्र आणि काही गोष्टी आज तुमच्या बाजूने सकारात्मक पारड्यात पडणार आहेत. म्हणून या संधीचे सोने करून घ्या. ज्यांनी आपल्यासाठी काही केलंय त्यांचे उपकार विसरू नका. सद्गुरूंना शरण जा.

कुंभ : कामांचा डोंगर उपसला जाईल

"कशासाठी कासाविशी कशासाठी आटापिटा" असा आजचा दिवस राहील. उगाचच मेहनत व कामांचा डोंगर उपसला जाईल. पण हाती काय येतंय? तर नारळाची करवंटी की काय! असे वाटून उद्विग्नता मनास येईल.

मीन : संसारासाठी विशेष वेळ द्याल

आजचा दिवस म्हणजे "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?" असाच आहे. संसारासाठी विशेष वेळ द्याल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. कोर्टकचेरीची कामे यशस्वी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT