मेष
मेष राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल. काहींची खूप प्रगती होणार असून व्यवसायात भरघोस यश मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक फायदा होईल. दिवस चांगला जाईल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. भविष्यात त्याचे बरेच फायदे होतील. सरकारी नोकरीचा योग आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी आज फालतू खर्च टाळायलाच हवा. आजारी व्यक्तीची आज आजारपणापासून सुटका होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आज नशिबाची चांगलीच साथ मिळणार. मेहनतीचे फळ चांगले मिळेल. आज पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. तुमचा थाटमाट पाहून शत्रू अस्वस्थ होतील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आज साधारण दिवस आहे. काहींना उदानसिनतेला सामोरे जावे लागू शकते. मधुरवाणीचा वापर करा, अन्यथा नात्यात कटुता येईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. अवघड काम तुम्ही धैर्याने पूर्ण करू शकाल. दिवसभर तुमची धावपळ होण्याची शक्यता. फालतू खर्चाचा योग सुद्धा दिसतो आहे.
तुळ
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. इतरांच्या भल्याचा विचार कराल आणि मनापासून सेवाही कराल. एखाद्या बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांचे मन आज अस्वस्थ असेल. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे खचून जाऊ नका. संयमाने आणि प्रतिभेने शत्रूच्या बाजूने विजय मिळवू शकाल.
धनु
धनु राशीच्या लोकांना आज विशेष फायदा होईल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार. रात्री तुमची तब्येत बिघडू शकते. सावधगिरी बाळगा आणि खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. पण त्याचबरोबर तुमचा अनावश्यक खर्चही वाढणार. इच्छा नसताना काही कामे करावी लागतील. सासरच्या मंडळींकडून मान-सन्मान मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होईल. धनलाभ होण्याची शक्यता, पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल. विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांना आज मान-सन्मान मिळेल तसेच संपत्तीत वाढ होईल. नातेवाईकांसोबतचे वाद असतील तर ते मिटतील. सामाजिक सन्मान मिळाल्याने तुमचे मनोबल वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.