Chanakya Niti google
राशिभविष्य

Chanakya Niti: पुरुषांनी 'या' 4 गोष्टी कोणासोबतही शेअर करू नये; आयुष्यभर कराल पश्चात्ताप!

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आजच्या काळात माणसाला आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन बनवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानी व्यक्तीने या सर्व गोष्टी स्वतःपुरता मर्यादित ठेवल्या पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चाणक्य हे इतिहासातील मोठं नाव मानलं जातं. चाणक्यांची 'चाणक्य नीती' अजरामर झाली आहे. आजच्या काळात देखील त्यांचं नाव आणि त्यांची धोरणं लोकं अंमलात आणल्याचं दिसून येतं. एक विद्वान ब्राह्मण, नीतिशास्त्रात तज्ज्ञ, आचार्य चाणक्य हे एक महान तत्वज्ञानी गुरु मानले जात होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठं यश संपादन केलं शिवा. संपूर्ण मौर्य राजवंशाची स्थापनाही केली.

आचार्य चाणक्यांनी आजच्या काळात माणसाला आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन बनवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर चाणक्य नीती या नीती पुस्तकात श्लोकांच्या रूपात हे संकलन केलंय. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी आचार्य चाणक्य यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पुरुषांनी कोणाशीही शेअर करू नयेत.

आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानी व्यक्तीने या सर्व गोष्टी स्वतःपुरता मर्यादित ठेवल्या पाहिजेत. त्या इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत. जर या गोष्टी इतरांना समजल्या तर त्या व्यक्ती तुमच्यावर हसू शकतात. जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत.

श्लोक

अर्थनाशं मनस्तपं ग्रह्ये दुश्चरितानि च ।

वंचन चाआपमानं च मतिमान् प्रकाशेयत् ।

काय आहे या श्लोकाचा नेमका अर्थ?

एखादी बुद्धीमान व्यक्ती जिने आपली संपत्ती, मानसिक समस्या, घरातील समस्या, फसवणूक किंवा झालेला अपमान कोणासोबतही शेअर करू नये. असं केल्यास भविष्यात या गोष्टी तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक हानी

प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्याचं दु:ख कमी करण्यासाठी तो ही गोष्ट इतर व्यक्तींसोबत शेअर करतो. मात्र असं केल्याने तुमचा त्रास वाढू शकतो. आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार, एखाद्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान झालं असेल तर धक्का बसण्याऐवजी त्यातून अधिक शिकावं.

कोणी फसवणूक केली तर...

अनेकवेळा आपली फसवणूक केली जाते. आचार्य चाणक्यांच्या मते, जर तुमची फसवणूक झाली तर ती गोष्ट देखील सर्वांसोबत शेअर करू नये. यामुळे तो तुमच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. शिवाय ती व्यक्ती तुम्हाला भविष्यात फसवण्याची शक्यता अधिक असते.

घरातील समस्या

प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात, मात्र या समस्या तुम्ही इतरांसोबत शेअर करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या घरातील दोष कोणाशी शेअर करत असाल तर तुमचा मान आणि सन्मान कमी होऊ शकतो. कोणी तुमच्या मागे तुमचं तुमची मस्करी करू शकतं.

अपमान झाला असेल तर

जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर ती गोष्ट देखील इतरांशी शेअर करू नका. यामुळे लोकं तुमच्यामागे तुमची चेष्ठा करण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर- या लेखात दिलेल्या माहितीच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी आम्ही देत नाही. ही माहिती ज्योतिषी, पंचांग, ​​श्रद्धा किंवा धार्मिक शास्त्र अशा विविध माध्यमांतून तुमच्यासमोर सादर करण्यात आली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे आहे. ते योग्य आणि सिद्ध असल्याची खात्री आम्ही देऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT