Y chromosome : बापरे! पुरुषांचं अस्तित्वच येणार धोक्यात? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

Y chromosome : नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, Y क्रोमोसोम हे नामषेश होत चाललं आहे. मुळात, Y क्रोमोसोम हे लिंग ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. याच रिसर्चनुसार, भविष्यात जास्तीत जास्त मुलींचा जन्म होणार असल्याची शक्यता आहे.
Y chromosome
Y chromosomeGoogle
Published On

येणाऱ्या भविष्यात केवळ मुलींचा जन्म होणार असं, आम्ही तुम्हाला सांगितलं तर? कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र असं आम्ही नाही तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, ही बाब समोर आली आहे. या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, Y क्रोमोसोम हे नामषेश होत चालले आहे. मुळात, Y क्रोमोसोम हे पुरुषाचं लिंग ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याच रिसर्चनुसार, भविष्यात जास्तीत जास्त मुलींचा जन्म होणार आहे. याला Y क्रोमोसोम लुप्त होणं, हे कारणीभूत आहे.

Y क्रोमोसोम म्हणजे नेमकं काय?

Y गुणसूत्र हे पुरुषांमध्ये आढळणारे लैंगिक क्रोमोसोस असून दाढी, मसल्सची वाढ आणि पुरुष जननेंद्रियांच्या विकासासाठी ते जबाबदार ठरतं. महिलांमध्ये XX गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये XY गुणसूत्र असतात.

नुकत्यात झालेल्या अभ्यासात Y क्रोमोसोम लुप्त होत असल्याचं समोर आलं. मुळात Y क्रोमोसोम नामशेष होणं लाखो वर्षांपासून सुरू असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. याचं कारण असं की, Y क्रोमोसोस इतर क्रोमोसोमपेक्षा अधिक वेगाने उत्परिवर्तन होतो. याशिवाय Y क्रोमोसोममध्ये इतर क्रोमोसेसपेक्षा कमी जीन्स असतात, ज्यामुळे ते कमी होण्याची अधिक शक्यता असते.

Y chromosome
Cooking Tips : अर्रर्र! इडली डोसाचं पीठ जास्त आंबलं? फेकून देऊ नका, 'या' टिप्सने आंबटपणा कमी होईल

रिपोर्टमध्ये काय झाला खुलासा?

यासंदर्भात जेनेटीक्स तज्ज्ञ प्रोफेसन जेनी ग्रेव्स म्हणाल्या की, Y क्रोमोसोम कमी होण्याची ही पहिली घटना नाही. XY क्रोमोसोस जोडी सामान्य क्रोमोसोससारखी दिसते. सस्तन प्राणी X आणि Y ही क्रोमोसोसची फार पूर्वीची सामान्य जोडी होती.

जेनी पुढे म्हणाल्या की, मानव आणि प्लॅटिपस वेगळे झाल्यापासून गेल्या 160 दशलक्ष वर्षांत Y क्रोमोसोसने 900 ते 55 आवश्यक जीन्स गमावले आहेत. याचाच अर्थ दर 1 दशलक्ष वर्षांनी Y क्रोमोसोस 5 जीन्स गमावते. जर याचा वेग अशाच सुरु राहिला तर आगामी ११० लाख वर्षांत Y क्रोमोसोस पूर्णपणे नष्ट होईल.

गर्भात असलेल्या बाळाचं जेंडर समजू शकतं?

क्रोमोसोम Y हे कसं काम करतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे क्रोमोसोम Y हे नामशेष का होतंय हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. बहुतेक सस्तन प्राणी म्हणजे जे आपल्या बालकांना दूध पाजतात, त्यांच्यामध्ये म्हणजेच महिलांमध्ये किंवा मादी प्राण्यांमध्ये 2 X क्रोमोसोम असतात. तर दुसरीकडे नर किंवा पुरुषामध्ये एक Y क्रोमोसोम असतो. संबंधांनंतर जेव्हा एग आणि स्पर्म्स यांचा संयोग होतो. यानंतर SRY एक जीन असतं.

गर्भधारणेच्या तब्बल १२ आठवड्यानंतर SRY जीन एक्टिव होतो. ज्याची माहिती घेऊन तुम्ही गर्भात असलेलं बाळ महिला आहे की, पुरुष आहे, हे समजू शकता.

Y chromosome
Meditation Benefits: मेडिटेशनचे 'हे' गुणकारी फायदे तुम्हालाही माहिती नसतील; वाचून व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com