Budh Gochar Saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 2025 सुरु होताच 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ; बुधाच्या गोचरमुळे संकटांचा काळ होणार सुरु, आर्थिक हानीही होणार

Budh Gochar 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाचा पहिला महिना खूप खास असणार आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 12:11 वाजता वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे गोचर सर्व राशींवर परिणाम करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे वर्ष खूप खास आहे, याचं कारण म्हणजे या काळात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाचा पहिला महिना खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या राशी बदलाचा सर्व 12 राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे.

बुध 2025 च्या सुरूवातीला गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. 4 जानेवारी रोजी दुपारी 12:11 वाजता वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे गोचर सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र या काळात काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा धनु राशीत प्रवेश अशुभ ठरणार आहे. या काळात तुमचे मन थोडं अस्वस्थ होणार आहे. मन चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होण्याचा धोका आहे. कामावर परिणाम होईल. व्यावसायिक लोकांच्या योजना यशस्वी होणार नाहीत. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून काही वाईट बातमी कळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांच्या कमाईवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जुन्या चुकांमुळे वैवाहिक जीवनात भांडणं होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात.

मीन रास

मीन राशीच्या लोकांवर बुधाच्या गोचरचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या काळात तुम्ही कठोर परिश्रम करावे लागू शकतात. नशीब तुमच्या बाजूने राहणार नाही. भागीदारीत काम करणाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. संताप करू नका यामुळे तुमचं काम बिघडू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परतवाड्यातील तरुणींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

SCROLL FOR NEXT