Mercury’s transit in Scorpio after Diwali 2025 to bring wealth and prosperity for three lucky zodiac signs. saam tv
राशिभविष्य

Rashi: दिवाळीनंतर 'या' ३ राशींचे भाग्य बदलणार; मिळणार धन अन् ऐश्वर्य

Budh Gochar: बुध ग्रह २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. यामुळे तीन राशींच्या जीवनात मोठा घडामोड होणार आहे. त्यांच्या करिअर, गुंतवणूक आणि आर्थिक गोष्टीं बाबतीत मोठा बदल होईल. चला जाणून घेऊया या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

Bharat Jadhav

  • बुध ग्रह २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:३९ वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

  • या बदलामुळे तीन राशींना विशेष लाभ होणार असून त्यांना धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल.

  • धन, व्यवसाय आणि करिअर क्षेत्रात मोठी प्रगती होईल.

दिवाळीच्या सणानंतर वाणी, वाणिज्य आणि व्यवसायाचा स्वामी बुध ग्रह तूळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार, ही खगोलीय घटना २४ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी दुपारी १२:३९ वाजता घडेल. वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचे स्वामित्व असतं. या राशीत बुध ग्रहाचा प्रवेश व्यक्तीच्या विचारसरणीत, संवाद शैलीत आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत धैर्य वाढवतो. बुध ग्रहाचे गोचर झाल्याने जातकांमध्ये धैर्य, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, शिवाय त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असते.

ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, मंगळाच्या राशीत बुध ग्रहाचे हे भ्रमण करिअर, गुंतवणूक आणि व्यवसायात चमत्कारिक बदल घडवून आणू शकते. याचा सर्वाधिक परिणाम हा तीन राशींच्या जातकांवर होणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ.

मेष

वृश्चिक राशीत बुध ग्रहाचे गोचर होण्याने मेष राशीच्या जातकांसाठी लाभकारी ठरणार आहे. या काळात या राशीचे जातक धोकादायक परंतु फायदेशीर निर्णय घेण्यास सक्षम असतील. गुंतवणूक, विमा, शेअर बाजार किंवा कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये मोठे नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही न्यायालयीन खटल्यात किंवा कायदेशीर वादात अडकला असाल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ लागू शकतो.

मिथुन

बुधाचे हे भ्रमण मिथुन राशीला फायदा देणारा ठरेल. या काळात तुम्ही नवीन योजना आखू शकता. त्या सावधगिरीने अंमलात आणू शकता आणि यश मिळवू शकता. अडकलेले काही जुने पैसे परत मिळू शकतात किंवा तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित नफा मिळू शकतो. परराष्ट्र व्यवहार, आयात-निर्यात किंवा संशोधनात गुंतलेल्यांना लक्षणीय यश मिळू शकते.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या जातकांसाठीही बुध ग्रहाचे भ्रमण लाभकारी ठरेल. त्यांच्या बोलण्याचा प्रभावीपणा असेल. समोरील व्यक्तीला ते आपल्या बोलण्याने प्रभावित करू शकतील. आखलेल्या कल्पना अंमलात येतील. मुलाखातीत यश मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT