Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: आज ग्रहांच्या स्थितीत होणार मोठी हालचाल; 'या' राशींसाठी सुखाचे दरवाजे उघडणार

Grah Gochar 2025: १५ मे २०२५ रोजी ग्रहांची विशेष स्थिती काही राशींसाठी महत्त्वाची असणार आहे. या दिवसाच्या खगोलीय स्थितीच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार १५ मे म्हणजे आजचा दिवस ग्रहांच्या क्रियाकलाप आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप खास आहे. आजच्या दिवशी अनेक ग्रह एकत्र येणार आहेत. यावेळी अनेक संयोग निर्माण होणार आहेत.

१५ मे रोजी हे योग होणार तयार

२०२५ च्या ज्योतिष दिनदर्शिकेनुसार गुरुवारी १५ मे २०२५ रोजी पहाटे १२:२० वाजता सूर्य मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या ज्योतिषीय घटनेला 'वृषभ संक्रांती' म्हणतात. यानंतर १२:३६ वाजता, सूर्य आणि गुरु ३० अंशावर येणार आहे. ज्यामुळे द्विदश योग निर्माण होणार आहे. त्यानंतर रात्री १:०७ वाजता ग्रहांचा राजकुमार बुध अश्विनी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध आणि शनि १५ मे २०२५ रोजी रात्री ११:०६ वाजता 'चालिसा योग' निर्माण करतील.

मेष रास

१५ मे रोजी ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत. करिअरमध्ये जलद प्रगती होऊ शकणार आहे. विशेषतः जे व्यवसाय किंवा स्वतंत्र व्यवसायात गुंतलेले आहेत. निर्णय घेण्याची क्षमता सुधारणार आहे. जुन्या प्रलंबित कामांना गती मिळेल.

वृषभ रास

ग्रहांच्या महान हालचालीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही दीर्घकालीन योजनेवर काम करत असणार आहे. तर आता त्याचे फळ घेण्याची वेळ आलीये.

कर्क रास

या दिवसाची ग्रहस्थिती मानसिक स्पष्टता मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. चांगले गुंतवणुकीचे पर्याय समोर येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT