Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog 2025: भूमिपुत्र मंगळ बनवणार पॉवरफुल योग; 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर पडणार नोटांचा पाऊस

Mars Bhumiputra powerful Rajyog: ज्योतिषशास्त्रात 'भूमिपुत्र' आणि ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह, एका विशिष्ट राशीत प्रवेश करून अत्यंत शक्तिशाली 'राजयोग' तयार करत आहे. याचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रह शक्ती, पराक्रम आणि साहसाचा कारक मानला जातो. साधारणतः मंगळ एका राशीत ४५ दिवस राहतो. सध्या मंगळ तूळ राशीत असून नोव्हेंबर महिन्यात तो आपल्या स्वगृह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या काळात मंगळ इतर ग्रहांसोबत संयोग करून अनेक शुभ-अशुभ राजयोगांची निर्मिती करणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केला असून लवकरच चंद्रासोबत युती करणार आहे. या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृश्चिक राशी (Scorpio)

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ-चंद्र युतीने तयार झालेला महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. जीवनात आनंदाचे क्षण येतील. पद-प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत.

तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या लोकांसा महालक्ष्मी राजयोग अत्यंत भाग्यशाली ठरू शकतो. या राशीच्या लग्न भावात शुक्र विराजमान असून मालव्य राजयोग तयार होणार आहे. या काळात आकस्मिक धनलाभ, व्यापारातून मोठा फायदा आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. वेतनवाढीचे योग आहेत. या काळात तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी नवम भावात महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या राशीच्या लग्न भावात शनि विराजमान आहेत, तर बाराव्या भावात राहु असून पंचम भावात उच्च राशीत असलेले गुरु विराजमान आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

SCROLL FOR NEXT