Bhadra Yog saam tv
राशिभविष्य

Bhadra Yog: भद्र राजयोगाने ३ राशींचे सुरु होणार सोन्याचे दिवस; घरात सुख-पैसा येणारच

Bhadra Yoga Effects On Zodiac Sign: बुधाचे मिथुन राशीत गोचर होणार आहे. यामुळे गुरूच्या युतीमुळे भद्रा राजयोगची निर्मिती होणार आहे. जो काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह मिथुन राशीत गोचर करणार आहे. ही एक महत्वाची ज्योतिषीय घटना मानली जातेय. यावेळी हे गोचर अधिकच खास ठरणार आहे. याचं कारण म्हणजे बुध ग्रहाची युती गुरूसोबत होणार आहे. यामुळे भद्रा राजयोग तयार होणार आहे. हा योग पंच महापुरुष योगांपैकी एक आहे.

बुध ग्रहाला गुरूची साथ हा प्रभाव अधिक सकारात्मक असणार आहे. या शुभ योगाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. परंतु विशेषत: ३ राशींना याचा विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींना नशीब, आर्थिक लाभ, करिअरची प्रगती या गोष्टी मिळू शकणार आहेत. या ३ राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

मिथुन रास

लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. बुध आणि गुरूची युती त्यांच्याच राशीत होणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रातही उत्तम संधी मिळवून देणार आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय क्षमता आणि नेतृत्व कौशल्य उदयास येणार आहे. वैयक्तिक जीवनात नातेसंबंध मधुर होतील आणि कुटुंबात सामंजस्य राहील.

कन्या रास

लोकांसाठीही हे गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण या राशीवर बुधाचं राज्य आहे. या गोचरच्या प्रभावामुळे लोकांच्या मनात विचारांची स्पष्टता येणार आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल संभवतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामंही आता पूर्ण होऊ शकतील.

धनु रास

धनु राशीसाठी गुरूची युती अत्यंत खास असणार आहे. या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या कामात कौतुक, पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनात नातेसंबंध मधुर राहतील, ज्यामुळे कुटुंब आणि मित्रांशी संबंध दृढ होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT