Budh Uday In Libra saam tv
राशिभविष्य

Budh Uday: दिवाळीपूर्वी बुध ग्रह 'या' राशींना देणार छप्परफाड पैसा; व्यवसाय-करियरमध्येही होणार लाभ

Budh Uday In Libra 2024: येत्या काळात दिवाळी असून या सणापूर्वी ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. तूळ राशीमध्ये बुधाचा उदय होणार असून यावेळी काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरप्रमाणे ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. येत्या काळात दिवाळी असून या सणापूर्वी ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. भाषण, व्यवसाय, शेअर बाजार यांच्यासाठी जबाबदार असलेला बुध ग्रहाचा उदय होणार आहे.

ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीमध्ये बदल होते तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. दिवाळीपूर्वी म्हणजेच 23 ऑक्टोबरला बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यावेळी तूळ राशीमध्ये बुधाचा उदय होणार असून यावेळी काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशी भाग्यशाली आहेत ते पाहूयात.

मेष रास

बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेला पैसा मिळणार आहे. तुम्ही कोणतीही मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. तुमचं धैर्य आणि पराक्रम वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड लाभ होणार आहे

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरू शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. इतर व्यवसायातही तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. नोकरीत लोकांना या काळात चांगल्या संधी मिळू शकणार आहेत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT