October to December 2026 horoscope : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत अनेक मोठे ग्रह गोचर होणार आहेत. या काळात गुरु, शुक्र, शनि आणि बुध या ग्रहांच्या शुभ चालीमुळे ४ राशींच्या नशिबाला मोठी कलाटणी मिळणार आहे. या काळात या राशींच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील, तसेच नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
दीर्घकाळापासून अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याचे योग आहेत. नोकरीत मनासारखे वातावरण राहील. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. पैशांशी संबंधित मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
सिंह (Leo)
वर्षाच्या शेवटचे तीन महिने अत्यंत लाभदायक ठरतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकते. कामातील उत्तम कामगिरीमुळे पगारात वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नासोबतच अवाजवी खर्च टाळणे गरजेचे आहे; कमाई आणि खर्च यात योग्य समतोल साधावा.
तुला (Libra)
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आर्थिक समस्या दूर होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क येईल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील, मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत घाईगडबड करणे टाळावे.
मकर (Capricorn)
पुढील ३ महिन्यात तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग (New Income Sources) उघडतील. नोकरी आणि व्यवसायातील जुन्या अडचणी संपुष्टात येऊन प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. योग्य निर्णय आणि मेहनतीच्या जोरावर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
डिस्क्लेमर (Disclaimer)
या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही. कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित ज्योतिषशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.