Lakshmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Raj Yog: एका वर्षानंतर मीन राशीमध्ये बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा

Laxmi Narayan Raj Yog: फेब्रुवारीमध्ये शुक्र आणि बुध ग्रहाची निर्मिती होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या निर्मितीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. दर महिन्यात कोणत्या ना कोणत्या राजयोगाची निर्मिती होत असते. फेब्रुवारीमध्ये शुक्र आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या निर्मितीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, मीन राशीमध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीने काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही राशींच्या मनात असलेल्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मीन रास

लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरावर तयार होणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारण्याची शक्यता आहे. या काळात जोडीदाराशी संबंध सुधारणार आहेत. बिघडलेलं नातं सुधारण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. अनावश्यक तणावापासून दूर राहाल.

कुंभ रास

लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे.

मिथुन रास

लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या काळात तुम्ही एखादं काम केलं तर त्यातून चांगले पैसे मिळतील. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. यावेळी बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. या काळात वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT