Dhanadhya Yog saam tv
राशिभविष्य

Dhan Shakti Yog: दिवाळीनंतर 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; धन दाता शुक्र बनवणार धनशक्ती योग

Dhan Shakti Yog 2025: शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे एक अत्यंत शुभ योग तयार होत आहे, ज्याला 'धन शक्ती योग' असे म्हणतात. या योगामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येणार असून, त्यांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दैत्यांचा गुरु शुक्राला संपन्नता, कला-संगीत, सुख-ऐश्वर्य, प्रेम आणि वैवाहिक जीवनाचं कारक मानलं जातं. शुक्र साधारणपणे २६ दिवसांत एकदा राशी बदलतात. त्यामुळे त्यांची इतर ग्रहांशी युती किंवा दृष्टी सतत घडत असते. ज्योतिष्य शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्यात शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. तेव्हा वृश्चिक राशीत आधीच मंगळ विराजमान असणार आहेत.

मंगळ-शुक्र युतीतून धनशक्ती राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव बाराही राशींवर काही ना काही प्रकारे पडणार असला तरी सिंह, कन्या आणि वृषभ राशींसाठी हा काळ विशेषतः लाभदायक मानला जात आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ २७ ऑक्टोबर रोजी आपल्या स्वराशी वृश्चिक राशीत प्रवेश करतील आणि ७ डिसेंबरपर्यंत तिथेच राहणार आहे. त्यानंतर शुक्र २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात मंगळ-शुक्र युतीतून धनशक्ती राजयोगाचा प्रभाव राहणार आहे

सिंह राशी (Leo)

सिंह राशीच्या चौथ्या भावात मंगळ-शुक्र युती होणार आहे. यावेळी बराच काळ अडून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल आणि नातेसंबंधात सौहार्द वाढेल. करिअरच्या दृष्टीने काही प्रवास करावे लागतील, जे लाभदायक ठरणार आहेत. नियोजनबद्ध गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळेल.

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या तिसऱ्या भावात मंगळ-शुक्र युती होतेय. या योगामुळे सर्व क्षेत्रांत यश मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग उघडतील. परदेशी नोकरीच्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे करिअरला नवी दिशा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या सातव्या भावात शुक्र आणि मंगळ युती होणार आहे. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या तसेच स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. व्यवसायात भागीदार किंवा गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये सुसंवाद वाढेल. अविवाहितांसाठी विवाहाचे योग प्रबळ होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Gemini मध्ये रेट्रो लूक फोटो कसा बनवायचा? Prompt कोणता वापरायचा? जाणून घ्या सविस्तर

IOB Recruitment: इंडियन ओवरसीज बँकेत सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

Maharashtra Weather : मुंबईत रेड अलर्ट, पुण्यात पूरस्थिती; पुढील चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT