Diwali 2025 saam tv
राशिभविष्य

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

Five Rajyog In Diwali 2025: हिंदू धर्मात दिवाळीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, आणि यंदाची दिवाळी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 'अभूतपूर्व' ठरणार आहे. कारण, तब्बल ८०० वर्षांनंतर एकाच वेळी पाच अत्यंत शक्तिशाली आणि शुभ राजयोग जुळून येत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सणाच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीने शुभ योग आणि राजयोग बनतात. यंदा दिवाळीला अशीच एक विशेष संधी आहे. यंदा दिवाळीला पाच राजयोगांचा निर्माण होणार आहे, आणि हे राजयोग ८०० वर्षांनंतर घडणार आहे. या पाच राजयोगांचे नावे आहेत शुक्रादित्य, हंस महापुरुष, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग आणि कलात्मक राजयोग.

या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र चार राशींवर हे विशेष प्रभावी ठरणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे. तसंच आकस्मिक धनलाभ आणि जीवनात प्रगतीसाठी योग निर्माण होणार आहे. चला तर पाहूया कोणत्या राशींना ही दिवाळी विशेष शुभ ठरणार आहे.

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी या पाच राजयोगांचा निर्माण अत्यंत शुभ फलदायी ठरू शकणार आहे. गुरु बृहस्पती हंस राजयोग आपल्या राशीपासून लग्न भावात बनतोय. तर कलात्मक राजयोग आपल्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या भावात बनतोय. या काळात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. या काळात कमाई वाढेल आणि नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील.

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी पाच राजयोगांचा निर्माण लाभदायी ठरणार आहे. हंस राजयोग आपल्या राशीपासून सप्तम भावात बनतोय. कलात्मक योग नवम भावात तर शुक्रादित्य राजयोग कर्म भावात बनतोय. या काळात काम-कौशल्यात प्रगती होणार आहे. विवाहित लोकांना संतान सुख मिळण्याची शक्यता आहे. जीवनात स्थिरता आणि संतुलन जाणवेल.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी पाच राजयोगांचा निर्माण अनुकूल ठरणार आहे. हंस राजयोग कर्म भावात, शुक्रादित्य राजयोग लग्न भावात आणि कलात्मक योग १२व्या भावात बनतोय. या काळात नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीसाठी संधी मिळू शकणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे. जुने गुंतवणुकीचे लाभ मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

SCROLL FOR NEXT