Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Tirgrahi Yog In Leo 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे योग आणि त्यांची स्थिती मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकते. कधीकधी काही दुर्मिळ ग्रहीय योग तयार होतात, जे दशकांनंतर किंवा शतकांनंतरच पाहायला मिळतात. असाच एक शक्तिशाली 'त्रिग्रही योग' तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • सप्टेंबर 2025 मध्ये बुध, सूर्य आणि चंद्र सिंह राशीत एकत्र येतील.

  • या त्रिग्रही योगामुळे काही राशींच्या नशिबाची घडी बसण्याची शक्यता आहे.

  • सिंह राशीसाठी हा योग आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढवणारा ठरेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात म्हणजेच गोचर करतात. काही विशिष्ट स्थितींमध्ये एकत्र येऊन त्रिग्रही किंवा चतुर्ग्रही योग तयार करतात. अशा योगांचा प्रभाव फक्त व्यक्तीच्या आयुष्यावरच नाही, तर संपूर्ण देशवर होत असतो.

सप्टेंबर २०२५ मध्ये बुध, सूर्य आणि चंद्र हे तिघे सिंह राशीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे तयार होणारा त्रिग्रही योग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींची नशिबाची घडी बसू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींचा चांगले पैसे मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह राशी (Leo)

तुमच्या राशीतच सूर्य, बुध आणि चंद्र एकत्र येत असल्याने हा त्रिग्रही योग तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल, तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय होऊ शकता. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra)

तुला राशीच्या जातकांसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकणार आहेत. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात प्रेमसंबंध अधिक मजबूत होणार आहेत. तुमची फायनान्शियल कंडीशन सुधारू शकते.

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या जातकांसाठीही हा त्रिग्रही योग धन आणि वाणी स्थानात होत असल्याने अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाइफमध्ये सुसंवाद वाढेल, नातेसंबंध गोड होतील. तुमचे मोठ्या लोकांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात.

सप्टेंबर 2025 मध्ये कोणते ग्रह सिंह राशीत एकत्र येत आहेत?

सप्टेंबर 2025 मध्ये सूर्य, बुध आणि चंद्र हे तीन ग्रह सिंह राशीत एकत्र येत आहेत.

त्रिग्रही योग कोणत्या राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे?

हा योग सिंह, तूळ आणि कर्क राशीसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे.

सिंह राशीच्या लोकांना या काळात कोणता फायदा होईल?

सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल , लोकप्रियता मिळेल आणि व्यवसायात नफा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग का फायदेशीर आहे?

तूळ राशीला नवीन उत्पन्नाचे स्रोत, गुंतवणुकीत फायदा आणि प्रेमसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या लोकांना या योगात कोणता धनलाभ होऊ शकतो?

कर्क राशीला अचानक धनप्राप्ती, अडकलेला पैसा परत मिळणे आणि आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT