Dhanalakshmi Rajyog saam tv
राशिभविष्य

Shani Uday: 30 वर्षांनंतर शनी गुरूच्या राशीत होणार उदय; या राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Shani Uday 2026 Date: ज्योतिषशास्त्रानुसार ३० वर्षांनी पुन्हा एकदा शनी गुरु राशीत उदय होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह हा महत्त्वाचा ग्रह मानला गेला आहे. त्यामुळे ज्यावेळी जेव्हा शनी देवाच्या गतीत बदल होतो तेव्हा या राशींवर विशेष प्रभाव पडतो. कर्माचे दाता शनिदेव एप्रिलमध्ये उदय होणार आहेत. मीन राशीत शनिदेव उदय करणार आहेत.

अशा परिस्थितीत शनिदेवांच्या उदयामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. तसंच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे काही राशींना चांगला फायदा होणार आहे.

धनु रास

आपल्या राशीपासून शनी चौथ्या स्थानावर उदय होणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळणार आहे. आपण लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकता. याशिवाय जर तुमचे काम जमीन, रिअल इस्टेट, प्रॉपर्टीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. या वेळी तुम्हाला कामात प्रगतीही मिळू शकते.

मकर रास

शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुमचं धैर्य वाढेल. या काळात आपण मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसंच जर तुमचं काम परदेशाशी जोडलेलं असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी देवाचा उदय अनुकूल ठरू शकणार आहे. बेरोजगारांना या वेळी नोकरी मिळू शकणार आहे. तसंच नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही ऑटोमोबाईल बिझनेस, मेटलशी संबंधित व्यवसाय, इंजिनीअरिंग आणि ऑईलशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT