Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींचा आज विनाकारण खर्चही होईल, पाहा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला जपावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी मात्र योग्य तो न्याय मिळेल.

वृषभ

आजच्या दिवशी तुम्हाला आनंदी आयुष्य जगायला आवडणार आहे. देवी उपासना करावी.

मिथुन

घरामध्ये माणसांचा राबता राहील. शेतीमध्ये फायदा दिसतो आहे.

कर्क

कामे करण्यासाठी एक वेगळी जिद्द आणि हुरूप येईल. मनाला आवडतील तेच काम घेतल्यामुळे यशाची पाऊलवाट चोखाळाल.

सिंह

कामामध्ये नवीन युक्त्या सापडतील. पैशाशी निगडित घडामोडी घडतील.

कन्या

जोम आणि जोश घेऊन कामे करावे लागतील. विशेष सकारात्मक भाव दिवसभरात राहतील.

तूळ

विनाकारण खर्चही होणार आहेत. मन संदिग्ध राहण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

मैत्रीमध्ये अबोला असेल तर आज ती टिकवण्याच्या दृष्टीने तुम्ही पुढाकार घ्यावा लागणार आहे. नव्याने परिचय आणि ओळखी होतील.

धनु

राजकारण आणि समाजकारणामध्ये विशेष सहभागी होणार आहात. दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत राहाल. कामांमध्ये प्रगती आणि बढतीचे योग आहेत.

मकर

शिव उपासना करावी लागणार आहे. लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ

सर्वांचं करून शेवटी आपण एकटे आहोत ही जाणीव होईल. प्रपंच मात्र वाढता राहणार आहे.

मीन

जोडीदाराबरोबर देवधर्म आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी, व्यावसायिक जोडीदारात बरोबर बैठक होईल.

टॉयलेटमध्ये का असतात फ्लशची दोन बटणं? योग्य वापर तुम्हाला माहितीये का?

Two Flush Buttons | saam tv
येथे क्लिक करा