Shani Vipareet Rajyog  saam tv
राशिभविष्य

Viprit Rajyog 2025: 30 वर्षांनंतर मार्गी शनी बनवणार विपरीत राजयोग; 'या' राशींना मिळणार नवे उत्पन्नाचे स्त्रोत

Shani Vipareet Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली रास बदलतो. कर्म आणि न्यायाचा देव मानला जाणारा शनि (Saturn) एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला सर्वात प्रभावी ग्रह मानलं जातं. याचं कारण म्हणजे तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनी ग्रहाला पुन्हा त्याच राशीमध्ये यायला जवळपास ३० वर्ष लागतात. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि तो नोव्हेंबरपर्यंत तसाच राहणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनी मार्गी होणार आहे. शनि मार्गी झाल्यानंतर सिंह राशीत 'विपरीत राजयोग' तयार होणार आहे.

केव्हा तयार होतो विपरीत राजयोग?

विपरीत राजयोग तेव्हा तयार होतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सहावा, आठवा किंवा बारावा भावाचा स्वामी त्या भावांमध्येच गोचर करतो. सध्या शनि सिंह राशीत सहाव्या भावाचा स्वामी असून आठव्या भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या स्थितीमुळे ‘विपरीत राजयोग’ तयार झाला आहे. यामध्ये काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहेत, या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

सिंह रास (Leo)

शनि हा या राशीतील सहावा आणि सातवा भावाचा स्वामी असून सध्या आठव्या भावात मार्गी होणार आहे. या राशींच्या आयुष्यात दीर्घकाळ चाललेले संघर्ष संपण्याची शक्यता आहे. करिअर, व्यवसाय, नोकरी अशा क्षेत्रात अचानक प्रगती होण्याचे योग आहेत. शनिची दृष्टि कर्म भावावर असल्यामुळे कार्यस्थळी नवे संधी आणि आर्थिक उन्नती मिळू शकणार आहे.

मिथुन रास (Gemini)

या राशीसाठी शनि नवव्या भावात मार्गी होणार आहे आणि त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. तु्म्हाला मोठ्या प्रोजेक्ट्सची जबाबदारी मिळू शकते. पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता जास्त आहे.

तूळ रास (Libra)

या राशीच्या सहाव्या भावात शनी मार्गी होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक ठरू शकणार आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मेहनतीमुळे तुमचं स्थान मजबूत होऊ शकणार आहे. आरोग्याच्या बाबतीतही जुने त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT