Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Kendra Trikona Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह हा न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानला जातो. सुमारे ३० वर्षांनी शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तो वेगवेगळ्या राशींसाठी विविध योग आणि परिणाम घेऊन येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनीची स्थिती फार महत्त्वाची मानली जाते. यामध्ये शनीच्या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. यावेळी कर्म देणारा शनि सर्वात मंद गतीने फिरतो. शास्त्रानुसार, शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो. ज्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर खूप काळासाठी अतिशय मंद गतीने पडतात.

शनि सुमारे ३० वर्षांनी मीन राशीत प्रवेश केला आहे. यावेळी जून २०२७ पर्यंत शनी या राशीत राहणार आहे. यामुळे शनी केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करतोय. ३० वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाल्याने काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या दहाव्या घरात शनि ग्रह केंद्र त्रिकोण राजयोग बनवणार आहे. त्यामुळे तो केंद्र त्रिकोण राजयोग देखील बनवतोय. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कामाच्या क्षेत्रात भरपूर फायदे मिळू शकणार आहेत. तुम्हाला परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. शनीची दृष्टी सातव्या घरावर आहे. तुम्हाला उच्च पद मिळू शकणार आहे.

मकर रास

कुंडलीच्या तिसऱ्या घरात शनि ग्रहाचं भ्रमण आहे. या राशीला नुकतीच शनि साडेसातीच्या काळापासून मुक्तता मिळाली आहे. यावेळी तुमची रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत. या राशीच्या लोकांना परदेशात नोकरी आणि व्यवसायातून लाभ मिळू शकणार आहे.

मीन रास

या राशीच्या लाभ घराचा स्वामी न्यायाधीश शनी आहे आणि लग्नाच्या घरात बसलेला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात शनी चांगले परिणाम देणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात जलद वाढ होऊ शकणार आहे. साडेसतीच्या पहिल्या टप्प्यात अनावश्यक खर्चामुळे त्रासलेल्यांना आता हळूहळू त्यातून आराम मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क कांदा-लसणामुळे घटस्फोट, तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला

Alibag Leopard : अलिबागमध्ये बिबट्याची दहशत! ५ जणांवर दिवसाढवळ्या हल्ला, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Kitchen Hacks : किचनमधील स्टिलची भांडी काळवंडली आहेत ? मग करा हे स्वस्तात मस्त उपाय

Maharashtra Live News Update: सावंतवाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

Pune Travel : ट्रेकिंगचा थरार अनुभवायचाय? वीकेंडला पुण्यातील ‘या’ किल्ला भेट द्या

SCROLL FOR NEXT