Shukra Nakshatra Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Shukra Nakshatra Gochar: 2 दिवसांनी शु्क्र करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना अपेक्षित फळासह मिळणार पैसे

Shukra Nakshatra Gochar 2024: शुक्र ग्रह सध्या हस्त नक्षत्रात आहे. मात्र १३ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह राशींप्रमाणे नक्षत्रात देखील बदल करतात. ग्रहांच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. येत्या काळात शुक्र त्याच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहे.

शास्त्रानुसार, शुक्र ग्रह सध्या हस्त नक्षत्रात आहे. मात्र १३ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे. यामध्ये या राशींना धनलाभाचे संकेत आहेत, तर आयुष्यात सुख येण्याचीही शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत?

कर्क रास

या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या घरात स्थित असून तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य झपाट्याने वाढणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. विवाहितांना सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. येणाऱ्या काळात जीवनात आनंद येणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात खूप फायदा होऊ शकणार आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला बिझनेसमध्ये भरपूर फायदा होणार आहे. परदेशात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

या राशीच्या चढत्या घरात शुक्र ग्रह आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. आर्थिक लाभ, करिअरमध्ये नफा या राशींना मिळणार आहे. येत्या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता कमी होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी?

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होणार; धन योगाला उत्तम दिवस; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Maharashtra Live News Update: हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या अजिंक्य कडला उरळी कांचन पोलिसांनी घेतलं ताब्यात

SBI प्रकरणात अंबानींना मोठा धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका; नेमकं प्रकरण काय? वाचा

Manoj Jarange: रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये, धनंजय मुंडेंना जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT