Chandra Surya Yuti saam tv
राशिभविष्य

Surya Mangal Yuti: 18 वर्षांनंतर बनणार सूर्य आणि मंगळाचा महासंयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

Sun And Mangal Conjunction 2025: १८ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रह युती होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकाच राशीत येत आहेत. ही युती काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून एकमेकांशी युती करतात. या युतीचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि पृथ्वीवर दिसून येणार आहे. आता ऑक्टोबर महिन्यात साहस देणारा मंगळ व ग्रहांचा राजा सूर्य यांची युती होणार आहे.

या संयोगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे. यावेळी करिअर, व्यवसाय आणि सरकारी नोकरीच्या क्षेत्रात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काहींना प्रत्येक कामातून यश मिळणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कन्या रास

सूर्य आणि मंगळाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुमची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता वापरून नवीन संधी मिळवता येणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य-मंगळाची युती लाभदायक ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या लग्न भावात होणार असल्यामुळे या काळात तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. उच्च शिक्षण, अध्यात्म आणि लांब प्रवासासाठी हा काळ योग्य आहे. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. विवाहितांचा वैवाहिक जीवन आनंदी येणार आहे

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय शुभ ठरू शकणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करणार आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसच्या कामानिमित्त दूरवर प्रवास करण्याची संधी मिळू शकणार आहे. वडिलांसोबतचे संबंध अधिक दृढ होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

Strawberry Icecream : लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT