ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Towelsupercenter च्या अहवालानुसार आंघोळ केल्यानंतर किंवा हात धुतल्यानंतर शरीर स्वच्छ होते, म्हणून टॉवेल देखील स्वच्छ असला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ओल्या टॉवेलने तुमचे शरीर किंवा हात पुसता तेव्हा ओलाव्यामुळे मृत त्वचेच्या पेशी, तेल आणि घाण तंतूंमध्ये अडकतात. टॉवेल पाणी शोषून घेतो, परंतु ते सुकण्यास तासन्तास लागतात.
हे ओलसरपणामुळे बॅक्टेरिया, बुरशी आणि यीस्ट सारख्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पुरक असतात. हे डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु कालांतराने ते वाढू शकतात, त्यामुळे त्वचेचे संक्रमण, पुरळ धोका वाढत असतो.
प्रत्येक वापरानंतर तुमचा टॉवेल धुणे आवश्यक नाही. तज्ञांचा असा सल्ला आहे की सामान्य परिस्थितीत अंघोळीचा टॉवेल तीन ते चार वापरांनंतर धुवावा.
दिवसभरात अनेक वेळा हात पुसले जातात म्हणून हाताचे टॉवेल यापेक्षा जास्त वेळा धुवावेत. एकदा वापरून झाले तर टॉवेल धुणे चांगले.
टॉवेल कुठे ठेवला आहे हे देखील महत्त्वाचे असते. जर बाथरूम ओलसर राहत असेल आणि हवेशीर नसेल. टॉवेल व्यवस्थित सुकला नसेल, तर तो वारंवार धुवावा.
मायक्रोफायबर टॉवेल्स लवकर सुकतात. तर कॉटन टॉवेल्स जास्त ओलावा टिकवून ठेवतात. त्यांना नियमित धुण्याची आवश्यकता असते. बांबूपासून बनलेले टॉवेल्स अँटीबॅक्टेरियल मानले जातात, पण ते वेळोवेळी धुवावे लागतात.
तज्ज्ञ जेनिफर अॅडम्स यांच्या मते, साधारणपणे दर १ ते दोन वर्षांनी अंघोळीचा टॉवेल बदलला पाहिजे. के