Grahan Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Mahayuti 2025: 100 वर्षांनंतर सूर्य, बुध आणि मंगळ बनवणार त्रिग्रही योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Sun Mercury Mars Trigrahi Yog: येणाऱ्या काळात असाच एक दुर्मिळ आणि अतिशय शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होणार आहे, ज्यात सूर्य (Sun), बुध (Mercury) आणि मंगळ (Mars) हे तीन प्रमुख ग्रह एकाच राशीत येणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार ग्रह सतत हालचाल करतात आणि कधी कधी एकत्र येऊन त्रिग्रही किंवा चतुर्ग्रही योग तयार करतात. अशा वेळेला त्याचा परिणाम केवळ माणसांच्या जीवनावरच नाही तर देश-परदेशातही जाणवतो. असाच ऑक्टोबर महिन्यात एक महत्त्वाचा त्रिग्रही योग तयार होणार आहे.

३ ऑक्टोबर रोजी बुध तुला राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबरपर्यंत मंगळही तुला राशीत असेल. या काळात १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल आणि १९ नोव्हेंबरपर्यंत तिथेच राहणार आहे. सूर्याच्या प्रवेशाने तुला राशीत सूर्य, बुध आणि मंगळ अशी त्रिग्रही युती होईल. या योगामुळे काही राशींवर खास प्रभाव पडणार आहे.

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीसाठी हा योग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. हा योग धनभावात होत असल्याने अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, गुंतवणुकीतून फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मानसिक शांतता मिळेल आणि सहकाऱ्यांशी नातेसंबंध सुधारतील.

कर्क राशि

कर्क राशीसाठी हा त्रिग्रही योग चौथ्या भावात होत असल्याने घरगुती आणि भौतिक सुखांचा आनंद वाढणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकून राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होणार आहे. आई-वडील आणि सासरच्या मंडळींबरोबरचे संबंधही या काळात घट्ट होतील.

तुला राशि

तुला राशीसाठी सूर्य, बुध आणि मंगळाची ही महायुती विशेष लाभदायी ठरणार आहे. हा योग लग्न भावात होत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. व्यक्तिमत्त्व आकर्षक बनेल आणि समाजात तुमचं नाव वाढणा. विवाहित व्यक्तींना वैवाहिक आयुष्यात समाधान मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना नातेसंबंध जुळण्याची संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: न्यायमूर्तींनी राज्य सरकारला झापलं, ३ वाजेपर्यंतची वेळ, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Methi Ladoo: मेथीचा पौष्टिक लाडू कसा बनवाल? 'ही' ट्रिक वापरा, कडवटपणा होईल दूर

Nanded- Pandharpur Express : नांदेड - पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोड स्टेशनवर थांबा; प्रवाशांची होणार सोय

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मृत्यू; रिक्षा चालवताना घडला भीषण अपघात, २ प्रवाशांचेही निधन

The Bengal Files: मी दोषी आहे, मला शिक्षा द्या...; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना संदेश, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT