Surya Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Surya Gochar: 100 वर्षांनंतर शनीच्या राशीत बनणार चतुर्ग्रही योग; नवीन नोकरी आणि धनलाभाची शक्यता

Surya Rashi Parivartan 2026: ज्योतिषशास्त्रानुसार १०० वर्षांनंतर शनी राशीत चार ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींना यामुळे नोकरीत नवीन संधी, व्यवसायात यश आणि आर्थिक लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारीमध्ये अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यावेळी काही राशींच्य युतीमुळे शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. या युतीमुळे प्रत्येक राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र कुंभ राशीत एकत्र स्थित असणार आहेत. ज्यामुळे एक शक्तिशाली चतुर्ग्रही योग निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काही राशींना समृद्धी मिळू शकणार आहे. या राशींना नवीन नोकरी मिळण्याची आणि त्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्नस्थानी तयार होईल. यावेळी तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. वडिलांशी असलेलं तुमचं नातं सुधारणार आहे.

मिथुन रास

चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या नवव्या घरात तयार होणार आहे. या काळात तुमचे भाग्य चांगलं राहणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुम्ही कामाशी संबंधित सहल देखील करू शकता. हा काळ लहान गुंतवणुकीसाठी अनुकूल असणार आहे.

वृश्चिक रास

तुमच्या राशीच्या चौथ्या घरात चतुर्ग्रही योग निर्माण होत असल्याने तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो. स्थावर मालमत्तेशी संबंधित असलेल्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात नशीब तुमची साथ देणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

SCROLL FOR NEXT