Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: 12 महिन्यांनी तयार होणार खास राजयोग; गुरु-शुक्राच्या कृपेने या राशींचं नशीबाचं ताळ उघडणार

ज्योतिषशास्त्रानुसार आगामी १२ महिन्यांत गुरु आणि शुक्र ग्रहांच्या कृपेने एक विशेष राजयोग निर्माण होणार आहे. या योगामुळे काही राशींवर भाग्याची दारे उघडतील आणि त्यांना संपत्ती, यश व आनंद प्राप्त होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, देवांचा गुरू बृहस्पति एका विशिष्ट कालावधीनंतर राशीमध्ये बदल करतो. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. यावेळी गुरु मिथुन राशीत वक्री स्थितीत बसला आहे आणि जून 2026 पर्यंत या राशीत राहणार आहे. अशा परिस्थितीत, कोणत्या तरी ग्रहाशी युती, कोनीय स्थिती किंवा दृष्टी दिसून येत राहील, ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होतील.

गुरु लवकरच संपत्ती आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्राच्या संयोगाने षडष्टक योगाची निर्मिती करणार आहेत. शुक्र-गुरू यांच्या संयोगाने तयार केलेला हा योग अनेक राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरू-शुक्राचा षडष्टक योग अनेक अर्थांनी खास असू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात बंपर फायदे मिळू शकतात. आयुष्यातील दीर्घकालीन समस्या संपू शकतात. कुटुंबात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात.

मेष रास

या राशीत शुक्र कुंडलीच्या आठव्या घरात आणि गुरू दुसऱ्या घरात गोचर करणार आहे. या राशीच्या लोकांसाठी षडष्टक योग अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकणार आहेत. चांगली पदोन्नती मिळू शकते. व्यवसायातही लाभ मिळण्याची अनेक शक्यता आहेत.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्राचा षडष्टक योग अनेक अर्थांनी विशेष ठरू शकणार आहे. करिअर क्षेत्रामध्ये तुम्हाला हवं ते काम मिळू शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यताही आहे. एखादा मोठा प्रकल्प किंवा करार होऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Chavan : KDMC साठी भाजपचा स्वबळाचा नारा? १२२ जागांसाठी हजारो कार्यकर्त्यांची तयारी

PM Narendra Modi : महायुतीच्या विजयानंतर PM मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले - 'महाराष्ट्र विकासाच्या...'

Maharashtra Live News Update: नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीची घोषणा उद्या, महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र

SCROLL FOR NEXT