Chaturgrahi Yog 2025 Saam Tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: ५० वर्षांनी बनणार दुर्मिळ चतुर्ग्रही योग! 'या' राशींवर शनी-बुधासह ४ ग्रहांची विशेष कृपा

Chaturgrahi Yoga In Meen: मार्च महिन्यात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. शुक्र, बुध, शनि आणि सूर्य देव यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक कालावधीनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्र सांगतं. अनेक ग्रहांच्या या बदलामुळे एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांचा प्रवेश होते. अशा स्थितीचा परिणाम एकत्रितपणे सर्व राशींच्या आयुष्यावर होत असतो. असंच येत्या काळात एका राशीमध्ये चार ग्रह एकत्र येणार आहेत.

शास्त्रानुसार, ग्रहांचा विशिष्ट अंतराने इतर ग्रहांशी संयोग होऊन चतुर्ग्रही योग तयार होतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर परिणाम होतो. मार्च महिन्यात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. शुक्र, बुध, शनि आणि सूर्य देव यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींसाठी यशाचा मार्ग खुला होईल. यामध्ये कोणत्या राशींना या राजयोगाचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या संधीही मिळणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकणार आहात. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही एखादे गाडी किंवा संपत्ती खरेदी करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे तुमच्या आईसोबतचे नाते मजबूत राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कौतुक होणार आहे.

मीन रास

चतुर्ग्रही योग तयार झाल्याने मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळवून देणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे ज्यामध्ये यश निश्चित आहे. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

SCROLL FOR NEXT