Take care of your health during the rainy season
Take care of your health during the rainy season  
आहार आणि आरोग्य

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

Health Tips - सर्वत्र मान्सून Monsoon दाखल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग Corona infection कमी होत असला तरी ब्लॅक फंगस Black fungus, येलो फंगसचा yellow  fungus धोका वाढत आहे. तसेच पावसाळ्यात Rainy season आरोग्याच्या Health तक्रारी अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच पावसाळ्यात Rainy season आरोग्याची Health Care काळजी घेणे गरजेचे आहे. ती काळही कशी घ्यावी जाणून घेऊया . 

- पावसाळ्यात बाहेर फिरून आल्यावर सर्वात आधी हातपाय स्वच्छ धुणे  गरजेचे आहे. तसेच काही अन्न पदार्थ खणीपुर्वी किंवा घरात फिरण्याआधी स्वच्छ हातपाय धुणे 
आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच आजकाल हँड सनिटायझर आल्याने त्याचा अधिक वापर हात स्वच्छ ठेवण्यासाठी होतो.  

हे देखील पहा - 

- पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाणे  टाळावे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपली रोगप्रतिकर शक्ति चांगली ठेवणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळे आपली रोगप्रतिकरक शक्ती कमी होते. तसेच बरेच वेळा बाहेरचे पदार्थ बनवणारे योग्य ती काळजी घेतातच असे नाही. त्यामुळे बाहेरील पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब किंवा पचनशक्तीमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळेच रस्त्यावरील बाहेरचे पदार्थ खने टाळावे. 

- पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी  सचून राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे साचलेल्या पाण्यात डानांची उत्त्पत्ती अधिक प्रमाणात होते. साचलेल्या चांगल्या पाण्यात मलेरिया, डेंगु यासारख्या डासांची पैदास होते. यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी क्रीम, गुड नाइट लिक्विड मशीन यासारख्या साधनांचा वापर करावा. 

- पावसाळ्याच्या दिवसात आपण सकस, शुद्ध, पोषक असा आहार घ्यायला पाहिजे. शक्य तितके घरचेच त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. हिरव्या भाज्या आणि ताजे फळे खाल्याने  रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

- पावसाळ्याच्या दिवसात त्वचेचे आजार होऊ शकतात. जसे की खाज सुटणे, फंगल इन्फेक्शन यासारखे त्वचेचे आजार उद्भावू शकतात. यामुळे मेथी, कारले यासारख्या
भाज्यांचा आहारात सेवन करावे. या भाज्यांतील पोषक घटक शरीरातील आणि चेहऱ्यावरील ताजेपणा निकून ठेवण्यास मदत करते. 

- पावसाळ्याच्या दिवसात आंबट पदार्थ खाणे टाळावे. आंबट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीरावर सूज येण्याची शक्यता असते. तसेच 
पचनशक्तीवर ताण पडणार नाही असे पदार्थ खाणे टाळावे. जसे की मांसाहार, तेलकट पदार्थ पचायला जड असतात. 

अशा पद्धतीने काळजी घेतल्यास तुम्हाला  पावसाळा आरोग्यदायी जाईल.  

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

SCROLL FOR NEXT