Omkar Therapy being used in covid Centre of Shegaon
Omkar Therapy being used in covid Centre of Shegaon 
आहार आणि आरोग्य

कोविड सेंटर मध्ये ॐ कार थेरपी डॉक्टरांचा - अनोखा फंडा!

संजय जाधव

बुलडाणा : जिल्ह्यात Buldana कोरोनाने कहर केला असताना मात्र शेगाव येथील शामसखा कोविड सेंटर येथील डॉक्टर्स कोविड रुग्णावर वर औषधोपचारासह चेस्ट एक्झरसाइज Chest Exercise थेरपीचा नोखा प्रयोग करीत आहेत आणि त्याना त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहे. कोविड रुग्णाना चेस्ट एक्झरसाइज व्हावा म्हणून डॉक्टरांची ही शक्कल रुग्णाना देखील फ़ायदेशीर ठरत आहे..! Shegav Doctro using Omkar Therapy in Covid Center 

हे देखिल पहा -

बुलडाणा जिल्हयातील शेगावच्या शामसखा कोविड Covid Centre सेंटरचे संचालक डॉ. भगतसिंग राजपूत हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील ऑक्सीजन लावलेल्या कोविड रुग्णाना सकाळी आणि संध्याकाळी अस दोन वेळेस ॐ कार थेरेपी देताहेत. दीर्घ श्वास घेऊन ॐ म्हटल्यानेने रुग्णाच ऑक्सीजेन सेच्युरेशन Oxygen Saturation बिना ओक्सिजन १० टक्क्याने वाढल्याचे ते सांगतात आणि त्याचा फायदा झाल्याच रुग्ण देखील सांगतात. आधीच ऑक्सीजन चा सर्वत्र तूटवडा त्यामुळे रुग्णाना ऑक्सीजन लावायचा म्हणजे संकट....त्यासाठी ॐ कार थेरेपी ने रुग्णाला फुफुसाचा व्यायाम तर होतोच पण रुग्णाला १० टक्के जास्त ऑक्सीजन मिळतो असा त्यांचा दावा आहे........

हे खाजगी कोविड सेंटर असल तरी हाउसफुल आहे.....या कोविड सेन्टर मध्ये रुग्ण आल्यापासून त्याला असे एक्सरसाइज सांगितले जातात. त्यामुळे रुग्णाला योग्य व्यायाम मिळतो . वेगवेगळ्या व्यायामा मुळे रुग्ण ही दिवसभर आनंदित राहून त्यांचं ऑक्सीजन प्रमाण वाढत आणि आहार ही चांगला जातो.....Shegav Doctro using Omkar Therapy in Covid Center 

(Desclaimer - हा प्रयोग यशस्वी असल्याचा संबंधित डाॅक्टरांचा दावा आहे. रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्याने याचा प्रयोग करावा)

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

SCROLL FOR NEXT