Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
आहार आणि आरोग्य

कोरोना लढ्यातील यशात मी निमित्तमात्र - उद्धव ठाकरे

वैदेही काणेकर

मुंबई : कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश आलेले नाही. पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. Maharashtra CM Uddhav Thackeray Meeting with Pediatrics 

मुख्यमंत्र्यांनी आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "कोरोन विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू. घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा, म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील,''

हे देखिल पहा

''माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल, याविषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध राहिले पाहिजे.पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे,'' असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. Maharashtra CM Uddhav Thackeray Meeting with Pediatrics 

ते पुढे म्हणाले, "कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले.गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो.  रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या,''

डाॅक्टर्सना सूचना देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत,'' Maharashtra CM Uddhav Thackeray Meeting with Pediatrics 

लसीकरणाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ''लसीकरणाच्या बाबतीतही मी सांगतो की १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे. पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे.आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला झात्री आहे, जून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील  सर्व नागरिकांचे लसीकरण  वेगाने सुरु करू शकू,''
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prices Of Pulses: डाळींच्या किंमती कडाडल्या!जाणून घ्या,आजचा प्रतिकिलोचा दर किती?

Today's Marathi News Live: नाशिकसाठी सोमवार ठरणार पॉलिटिकल ब्लॉकबस्टर

Satara Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत नाही, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही; वयोवृद्ध आजोबांचा निर्धार

Buldhana Crime: लग्नाच्या मिरवणुकीत तुफान राडा! दोन गटात दगडफेक; ३ जण जखमी

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

SCROLL FOR NEXT