Satara Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत नाही, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही; वयोवृद्ध आजोबांचा निर्धार

Lok Sabha Election : जोपर्यंत आमदार शशिकांत शिंदे निवडून येत नाहीत तोपर्यंत आपण पायात चपला घालणार नाही असा निर्धार या आजोबांनी केली आहे. त्यामुळे सध्या या भागात त्यांचा निर्धार चर्चेचा विषय बनलाय.
Satara Constituency
Satara ConstituencySaam TV

ओंकार कदम, सातारा

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगलीये. प्रत्येक उमेदवार आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळावीत आणि विजय व्हावा यासाठी प्रचारसभा घेत आहेत. उमेदवारांचे समर्थक विविध पद्धतीने लोकांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार करत आहेत. अशात सातारा लोकसभा मतदारसंघातून एक अजब प्रकार समोर आलाय. एका आजोबांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मोठा निर्धार केला आहे.

Satara Constituency
Satara Loksabha: साताऱ्यात आज उदयनराजे भोसलेंचे शक्तिप्रदर्शन! मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते प्रचारासाठी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातील खटाव तालुक्यात असणाऱ्या विसापूर येथील भगवान शंकर साळुंखे हे आजोबा आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

पायात चपला घालणार नाही

जोपर्यंत आमदार शशिकांत शिंदे निवडून येत नाहीत तोपर्यंत आपण पायात चपला घालणार नाही असा निर्धार या आजोबांनी केला आहे. त्यामुळे सध्या या भागात त्यांचा निर्धार चर्चेचा विषय बनलाय. सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचला असला तरी हे आजोबा आमदार शशिकांत शिंदे यांचा प्रचार पायात चपला न घालता करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी देखील आपल्या मतदारसंघात प्रचार सभांना जोर लावला आहे. महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे सातारा लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. अशात आता आजोबांचा प्रचार उदयनराजे भोसलेंवर भारी पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Satara Constituency
Satara: धक्कादायक! कोयनेच्या शिवारात Speed Boat बुडाली, बोटीतील तिघांचं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com