हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी 'हे' चार पदार्थांचा खा ! Saam Tv
आहार आणि आरोग्य

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी 'हे' चार पदार्थांचा खा !

हिमोग्लोबिनची कमतरता बहुधा स्त्रियांमध्ये दिसून येते. आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिन करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Increase Hemoglobin: हिमोग्लोबिनची कमतरता बहुधा स्त्रियांमध्ये दिसून येते. आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिन करते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी खनिजे, लोह आणि प्रथिने आणि पोषक तत्वांची नियमित आवश्यकता असते. हिमोग्लोबिन ही लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवणारी समस्या आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बरेच लोक अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपल्या आहारात काही निरोगी पदार्थांचा समावेश करून आपण हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करू शकता. तर मग आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या पदार्थांबद्दल सांगू.

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा

1. हिरव्या पालेभाज्या

जर आपण शाकाहारी असाल तर आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. पौष्टिक गुणधर्म हिरव्या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. शरीरात हिमोग्लोबीनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

2. शेंगदाणे

शेंगदाणे आरोग्यासाठी, विशेषत: शाकाहारी लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. शेंगदाण्यांमध्ये लोह, प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. हिमोग्लोबीनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळ, सोयाबीन आणि मटार इत्यादी आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.

3. सुकामेवा

दररोज खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुका यासारखे मुठभर ड्राय फ्रुटचा खाल्यास हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. त्यामध्ये पुरेसे लोह असते. आणि लाल रक्त पेशी वेगाने वाढविण्यात मदत करू शकते.

4. बियाणे

आहारात बियाणे समावेश केल्यास लोहाच्या कमतरतेवर मात करता येते. चिया, भोपळा, फ्लेक्ससीड इत्यादींची बियाणं आरोग्यासाठी चांगली मानली जातात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण त्यांना स्नॅक्स, कोशिंबीरी आणि भाज्यांमध्ये मिसळून त्यांचा वापर करू शकता.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पैसे देणाऱ्याला अन् घेणाऱ्याला बेड्या ठोकल्या, मध्यरात्री संभाजीनगरचं वातावरण तापलं; ठाकरेसेना अन् शिंदेसेना आमनेसामने!

Success Story: दिवस रात्र एक करुन अभ्यास केला,UPSC क्रॅक केली, दिव्यांग IAS ऑफिसर इरा सिंघल यांचा प्रेरणादायी प्रवास

Viral Video: बापरे...सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

SCROLL FOR NEXT