एक्स्क्लुझिव्ह

सुपरफास्ट मुंबईवर बत्ती गुलचा असा झाला परिणाम, वाचा मुंबई जागच्या जागी कशी थांबली...

साम टीव्ही

आज आक्रीत घडलं. सतत धावणारी मुंबई अनलॉकमध्ये रांगायचा प्रयत्न करत असतानाच अचानक थबकली  रस्त्यांवरचे सिग्नल बंद पडले आणि गाड्यांची चाकं जिथल्या तिथं थांबली  मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तब्बल दोन तास हे चित्र दिसत होतं. प्रत्येक यंत्रणा कुणीतरी स्टॅच्यू केल्यासारखी स्तब्ध झाली.

ट्रेन जागच्या जागी
मुंबईतील लोकलसेवा ठप्प झाली आणि नोकरीवर जाणारा चाकरमानी गाडीत अडकून पडला. कुणी चालत तर कुणी एसटी-बसने ऑफिस गाठलं.

हॉस्पिटलच्या ओपीडीत रुग्णांना घाम
अनेक रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना वगळता इतर आजारांसाठी ओपीडी सुरू केल्यायत. मात्र वीज गायब झाल्याने रुग्णांना हातातल्या वस्तूंनी हवा घेण्याची वेळ आली.

ऑनलाईन शिक्षणावर अडीच तास फुली
शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिकवण्या चालू आहेत. मात्र विजेनं दगा दिल्यानं मुलांच्या अभ्यासावर अडीच तास फुली मारली गेली. त्याचप्रमाणे अनेक कॉलेजांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या.

उद्योग, कार्यालयांतली लगबग थांबली
वीज गायब झाली आणि हळूहळू सुरू होणाऱ्या उद्योगांची चाकं जागच्या जागी थांबून राहिली. तर अनेक कार्यालयांत बंद पंखे आणि शुकशुकाट बघायला मिळत होता.

धावणाऱ्या गाड्यांची चाकं थबकली
विजेनं अचानक दगा दिला आणि रस्त्यांवरचे सिग्नल झोपून गेले. परिणामी मुंबईतील अनेक सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांची रीघ लागली होती. वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडला.

 बँकांचे व्यवहार अडीच तास शून्यावर
लाईट गेल्याने बँकांमधील लोकांची कामं रखडली. अनेक ठिकाणी एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशिन बंद असल्याने बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या.

हॉटेलमध्ये अंधार, ग्राहकांची पाठ
अनलॉकमध्ये सुरू झालेल्या हॉटेलात आता कुठं वर्दळ वाढू लागली होती. हॉटेल व्यवसाय जीव धरू लागली होती. पण अचानक लाईट गेल्याने हॉटेलचे पंखे, एसी बंद पडल्या. त्यामुळे ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली. त्यामुळे हॉटेलांमधील खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.

कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने धावणारी मुंबापुरी तब्बल अडीच तास एका जागी स्तब्ध झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT