tiger corona
tiger corona 
एक्स्क्लुझिव्ह

अमेरिकेत प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला कोरोना, कर्मचाऱ्यालाही लागण झाल्याचा अंदाज

साम टीव्ही

एका वाघिणीला कोरोना झालाय. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधली ही घटना आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळतोय. आणि याच न्यूयॉर्कमध्ये आता प्राण्यांना सुद्धा कोरोना होत असल्याचं दिसतंय. नादिया नावाची ही वाघीण आहे. प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्याकडून या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्यचा अंदाज आहे. 

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचा-याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघही त्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना झाला.

दरम्यान, न्यूयॉर्कमधील हे प्राणीसंग्रहालय 16 मार्चपासून बंद आहे. ज्या वाघिणीला कोरोना झाला आहे तीचे नाव नादिया असून, काही दिवसांपूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती. यात नादिया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळं आता इतर 5 सिंह आणि वाघांचे नमुने घेण्यात आले आहेत, इतर प्राणीसंग्रहालयातील सिंहामध्ये ही लक्षणे दिसत आहेत. प्राणिसंग्रहालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारावर वाघांची बहीण अजूल, अमूर टायगर्स आणि 3 आफ्रिकन सिंहांना कोरडा खोकला आला होता आणि लवकरच बरे होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याची लक्षणे इतर प्राण्यांमध्ये दर्शविली गेली नाहीत.

Web Title - marathi news tiger infected by corona virus in america 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे 'बुरे दिन' सुरु; दोन दिवसांत 47000 कोटी रुपयांचं नुकसान, १३ टक्क्यांनी शेअरची घसरण

Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Onion Export Reaction: कांदा निर्यातीच्या निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला फोडणी; कोण काय म्हणालं? Video

Leftover Frying Oil : तळून उरलेल्या तेलाचा 'या' कामांसाठी होतो उपयोग

SCROLL FOR NEXT