Onion Export Reaction: कांदा निर्यातीच्या निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला फोडणी; कोण काय म्हणालं? Video

Onion Export Reaction: केंद्र सरकारच्या निर्णयावर राजकीय नेत्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका बाजुला निर्णयाचं स्वागत केलं त्याच क्षणी सरकारवर संधी साधू असल्याची टीका देखील केल्याचं दिसत आहे.
Onion Export Reaction: कांदा निर्यातीच्या निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला फोडणी; कोण काय म्हणालं? Video
Onion Export Reaction Saam Tv
Published On

Leaders Reaction On Central Government Permitted Onion Export : केंद्र सरकारने एका दिवसाआधी गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली होती. आता केंद्र सरकारने इतर राज्यातील कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिलीय. केंद्राने 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. केंद्राने लोकसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवत हा निर्णय घेतल्याची टीका आता केली जात आहे.

दरम्यान गुजरातमधील कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर केंद्रावर चहुबाजूंनी टीका केली जात होती. इतर राज्यातील सरकार आणि शेतकरी केंद्राला प्रश्न विचारत होते. त्यानंतर आता केंद्राने इतर राज्यातील कांदा निर्यातीस परवानगी दिलीय. मात्र यावरून महाराष्ट्रात चर्चेला फोडणी बसलीय. केंद्र सरकारच्या निर्णयावर राजकीय नेत्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका बाजुला निर्णयाचं स्वागत केलं त्याच क्षणी सरकारवर संधी साधू असल्याची टीका देखील केल्याचं दिसत आहे.

निवडणुकांसाठी हा निर्णय घेतला नाही- दरेकर

आधी गुजरातला कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आली आणि मग इतर राज्यांना परवानगी देण्यात आली, अशी टीका सर्वच स्तरावरून करण्यात येत असताना यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया दिलीय. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलीय. आता बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्यात आलीये.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता. यावर प्रवीण दरेकर म्हणतात, "निवडणुका समोर ठेवून जर निर्णय घ्यायचा असता तर तो दोन टप्प्या आधीच घेतला गेला असता. त्यामुळे निवडणुका समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही हे स्पष्ट आहे."

हेमंत गोडसे काय म्हणाले

सगळ्यात जास्त कांदा उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्राला कांदा निर्यातीची परवानगी का देण्यात आली नव्हती आणि आत्ताच ऐन निवडणुकीत ती परवानगी का दिली जातेय असा प्रश्न विरोधक विचारतायत. विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांची सारवासारव सुरूच आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांनंतर आता हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया समोर आलीये. खासदार हेमंत गोडसेंनी सरकारचे आभार मानलेत.

शेतकरी नेते अजित नवले

"सगळ्यात जास्त कांदा ज्या महाराष्ट्रात निर्माण होतो त्या राज्यातील शेतकरी जेव्हा कांदा निर्यात बंदी उठवा असं म्हणत होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मतदानावर परिणाम होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे."

काय म्हणाले राजू शेट्टी

केंद्र सरकारने घाईघाईनं ९९,१५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. एवढं पुरेसं नाही. ४ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फायदा होईल. हा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

Onion Export Reaction: कांदा निर्यातीच्या निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला फोडणी; कोण काय म्हणालं? Video
Onion Export: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, कुठे-कुठे कांदा पाठवता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com