एक्स्क्लुझिव्ह

कोरोनावर पहिलं प्रभावी औषध, मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशानं कमी

साम टीव्ही

आणि आता अख्ख्या जगाला दिलासा देणारी बातमी. कोरोनावर प्रभावी असणारं एक औषध ब्रिटननं शोधलंय. नक्की कसं काम करतं हे औषध. तुम्हीच पाहा.

कोरोनावर रामबाण ठरणारी लस शोधण्याचं काम साऱ्या जगात युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच ब्रिटनला कोरोनावर एक प्रभावी औषध शोधण्यात यश आलंय. काही गंभीर रुग्ण या औषधामुळे बरे झाल्याचं दावा ब्रिटननं केलाय. हे औषध एक प्रकारचं उत्तेजक आहे. डेक्सामिथासोन असं या औषधाचं नाव आहे.

कोरोनावर डेक्सामिथासोन प्रभावी ? 

  • हे उत्तेजक शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं
  • श्वसनाशी संबंधित समस्या कमी करण्यावर प्रभावी औषध
  • या औषधाच्या वापरामुळे गंभीर रुग्णांतील मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशानं कमी झालंय
  • व्हेंटिलेटरवर असलेले एक तृतीयांश आणि ऑक्सिजनवर असलेले एक पंचमांश रुग्ण या औषधामुळे बरे झाले. कमी लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये हे औषध फारसं प्रभावी ठरत नाही

डेक्सामिथासोन हे औषध कमी खर्चिक असल्याचाही दावा ब्रिटननं केलाय. जगभरात कोरोनामुळे दररोज हजारो मृत्यू होतायंत. हे मृत्यू रोखण्यासाठी हे औषध रामबाण इलाज ठरण्याची शक्यता आहे. आशा करुयात लवकरात लवकर साऱ्या जगात या औषधाचा वापर सुरु होईल आणि हजारो प्राण वाचतील.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT