Latur Couple Planted Trees Before Marriage 
एक्स्क्लुझिव्ह

आधी केले वृक्षारोपण; मग अडकले विवाह बंधनात

दीपक क्षीरसागर

लातूर - आपल्या वैवाहिक जीवनाची Marriage Life  सुरुवात करत असताना वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याने प्रेरित होऊन लातुर Latur जिल्ह्यातील औसा तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी प्रा. निलेश क्षीरसागर आणि मोनिका भोजने यांनी विवाह बंधनात अडकण्यापूर्वी २१ विविध प्रकारची झाडांची लागवड केली. या 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देणाऱ्या अनोख्या विवाहाचे कौतुक होत आहे. Latur Couple Planted Saplings before Marriage Ceremony 

लॉकडाऊन Lock Down असल्याने सध्या विवाह सोहळ्यास मर्यादित संख्येत परवानगी देण्यात आली आहे. आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात एका चांगल्या उपक्रमाने व्हावी या हेतूने प्रा.निलेश क्षीरसागर आणि मोनिका भोजने यांनी २१ झाडांची लागवड करून पर्यावरण संरक्षण काळाची गरज हा संदेश दिला. या नव दांम्पत्याने स्वतः श्रमदान करून खड्डे केले. शिवाय, वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडुनिंब अशी २१ पर्यावरण पूरक झाडे लावली. 

सध्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटले आहे. झाडांकडून आपण सर्वजण मोफत ऑक्सिजन घेतो त्यामुळे झाडे लावून ती जगविली पाहिजेत हा संदेश देण्यासाठी या नवं दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. केवळ वृक्षारोपण करून हे हे नवं दाम्पत्य थांबणार नसून दोघे मिळून ही लावलेली झाड जगविणार आहेत असा निर्धार त्यांनी केला. Latur Couple Planted Saplings before Marriage Ceremony 

वसुंधरा प्रतिष्ठानच्या गत सहा वर्षातील कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे यावेळी प्रा.निलेश क्षीरसागर यांनी सांगितले. या अनोख्या पर्यावरण पूरक विवाह सोहळ्याची चर्चा झाली अन एक चांगला संदेश यातून गेला. शिवाय, उपस्थित प्रत्येक पाहुण्यांना एक वृक्ष रोप भेट देऊन झाड जगवावे, असे आवाहन करण्यात आले. 

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT